Crime Saam tv
महाराष्ट्र

अंगावर रॉकेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न; प्रसंगावधानाने विवाहिता बचावली

अंगावर रॉकेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न; प्रसंगावधानाने विवाहिता बचावली

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : घरातून बाहेर जाण्यास नकार दिल्याच्या कारणावरून विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना थाळनेर (ता. शिरपूर) येथे घडली. विवाहितेने प्रसंगावधान राखून आग विझविल्याने ती बचावली. तिच्या फिर्यादीवरून थाळनेर पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (dhule news Attempting to ignite by throwing kerosene on the body)

खंडेरावपाडा (थाळनेर) येथील कविता दीपक जमादार (वय २७) असे विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह दीपक कमलसिंह जमादार याच्याशी झाला आहे. २ मार्च सकाळी दहाला तिचा जेठ दिनेश कमलसिंह जमादार याने त्याची आई ऊर्मिला जमादार हिला फोन करून ‘कविताला घरातून हाकलून दे,’ असे सांगितले. कविताशी फोनवर बोलताना त्याने (Crime News) शिवीगाळ केली. तिने घराबाहेर पडण्यास नकार दिल्याने संतापलेला पती दीपक व सासू ऊर्मिला यांनी तिला मारहाण केली. दीपकने तिचा गळा दाबला.

सासूने टाकले रॉकेल

‘ही घराबाहेर जात नाही, तर तिला कायमचे संपवू,’ असे सांगत ऊर्मिला जमादार हिने घरातून दिवा आणून त्यातील रॉकेल कविताच्या अंगावर ओतले. दीपकला चिथावणी देऊन पेटविण्यास सांगितले. त्याने काडी ओढून कविताला पेटवून दिले. मात्र, तिने वेळीच आग विझविली. तिच्या फिर्यादीवरून संशयित दीपक जमादार, ऊर्मिला जमादार (दोघे रा. थाळनेर) व दिनेश जमादार (रा. शिरपूर) (Shirpur) यांच्याविरोधात थाळनेर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल केला. संशयित दीपकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात 280 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

Thailand Visa Free For Indians: भारतीय प्रवाशांसाठी थायलंडने पुढील सूचना मिळेपर्यंत व्हिसा-मुक्त प्रवेश वाढविला; वाचा

Dhule News : धुळे जिल्ह्यात ९३ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीत मराठा समाज कोणाच्या पाठिशी असणार? ऐन निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य

जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० वरून राडा, भाजप आमदारांनी प्रस्तावाच्या प्रती फाडून फेकल्या, VIDEO

SCROLL FOR NEXT