महाराष्ट्र

घरफोडी करून पोहचला विमानतळावर; पोलिसांनी केले जेरबंद

घरफोडी करून पोहचला विमानतळावर; पोलिसांनी केले जेरबंद

भूषण अहिरे

धुळे : घरफोडी करून सूरत गाठले. येथून विमानाने पळण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारास साथीदारासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. (dhule news Arrived at the airport by burglary arrested by police)

गेल्या काही दिवसांपूर्वी दोंडाईचा येथे भर दिवसा घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची तक्रार दोंडाईचा पोलीस (Police) ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या चोरीच्या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या चोरीचा छडा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला देखील या चोरीच्या घटनेसंदर्भात तपास करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.

दिल्‍लीकडे जाण्याची तयारी

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आपले तपासाची चक्रे फिरवली असता या घटनेमागे नंदुरबार (Nandurbar) येथील इसम असल्याची माहिती समोर आली. तो सध्या सुरत येथे पळून गेला असल्याची देखील माहिती मिळाली. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुरत (Surat) येथे पथक पाठवले असता सुरत येथील विमानतळावरून हा चोरटा दिल्लीच्या दिशेने पळणार असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सूरत विमानतळावरच त्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे नंदुरबार येथील साथीदार देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली देण्यात आली असून, चोरी केलेल्या मुद्देमालासह या चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुसक्या आवळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT