Dhule News
Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: लंम्‍पी स्कीन प्रादुर्भाव कमी; तब्बल पाच महिन्यानंतर जनावरांचा बाजार सुरू

भूषण अहिरे

धुळे : लंम्‍पी स्कीनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाच ते सहा महिन्यांपासून जनावरांची खरेदी विक्रीचा बाजार बंद होता. यामुळे सर्व व्‍यवहार देखील ठप्प झालेले होते. मात्र लम्‍पीचा (Lumpy Disease) प्रादुर्भाव कमी झाल्‍याने आज जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर बाजार सुरू झाला आहे. (Live Marathi News)

लंम्‍पी स्कीनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धुळे जिल्हा प्रशासनातर्फे जनावरांच्या खरेदी-विक्रीवर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बंदी घालण्यात आलेली होती. याच पार्श्वभूमीवर (Dhule News) धुळ्यात जनावरांचा भरणारा बाजार हा पाच ते सहा महिने बंद असल्यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल पूर्णपणे ठप्प झालेली होती. परंतु लंपिस्किन या आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनातर्फे जनावरांच्या खरेदी विक्रीवर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले.

म्‍हशींच्‍या खरेदी– विक्रीचा मोठा बाजार

जनावरांच्या खरेदी-विक्रीस जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर आजपासून सुरुवात झालेली आहे. आज तब्बल चार ते पाच महिन्यानंतर जनावरांचा बाजार भरवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील म्हशींचा खरेदी विक्रीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारपेठेकडे बघितले जाते. महाराष्ट्रासह राज्याबाहेरील देखील म्हशी या बाजारपेठेमध्ये खरेदी विक्रीसाठी आणले जातात. जवळपास आठवड्यात एकदा भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या दिवशी दोन ते तीन कोटींची उलाढाल ही जनावरांच्या खरेदी विक्रीतून होत असते.

व्‍यवहार आजपासून सुरू

जवळपास चार ते पाच महिन्यांपासून जनावरांच्या खरेदी विक्रीचा बाजार बंद असल्यामुळे त्यावर आधारित उद्योग व्यवसाय देखील ठप्प झालेले होते. परंतु जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर आता जनावरांची खरेदी विक्री सुरू झाल्यामुळे हे बंद पडलेले उद्योग देखील सुरू झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yamaha च्या या स्कूटरमध्ये मिळेल 21 लीटर अंडरसीट स्टोरेज, 49 Kmpl मायलेज; जाणून घ्या किंमत

Upcoming Bikes: मार्केट होणार जाम! जूनमध्ये लॉन्च होणार Royal Enfield Guerrilla 450; किती असेल किंमत?

24GB RAM आणि 50MP कॅमेरा असलेल्या फोनवर मिळत आहे 23,000 रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

GT vs KKR : गुजरातचं प्लेऑफचं स्वप्न पावसात गेलं वाहून; GT vs KKR सामना एकही चेंडू न टाकता रद्द

Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT