vidhan parishad 
महाराष्ट्र

धुळे व नंदुरबार विधानपरीषदेच्‍या निवडणुकीत एक अर्ज अवैध

धुळे व नंदुरबार विधानपरीषदेच्‍या निवडणुकीत एक अर्ज अवैध

भूषण अहिरे

धुळे : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांवर आज छाननी प्रक्रिया झाली. यानंतर पाच अर्ज वैध ठरविण्यात आले. तर एक अर्ज अवैध ठरविण्यात आला. (dhule-news-An-application-in-Dhule-and-Nandurbar-Legislative-Council-elections-is-invalid)

धुळे व नंदुरबार जिल्हा विधानपरिषद निवडणुकीसाठी सहा उमेदवारांचे अकरा अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी पार पडली. छाननीनंतर पाच उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. तर एक उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.

माघारीनंतर चित्र स्‍पष्‍ट

वैध उमेदवारीपैकी अमरीशभाई पटेल (भाजप), गौरव वाणी (काँग्रेस), तर अपक्षमध्‍ये भूपेश पटेल, दीपक प्रभाकर दिघे, शामकांत सनेर यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. तर यापैकी अशोक पाटील यांचा उमेदवारी अर्ज काही कागदोपत्री अडचणीमुळे अवैध ठरविण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती जिल्हा प्रशासनातर्फे दिलीप जगदाळे यांच्यातर्फे देण्यात आली आहे. आता यापैकी कोण उमेदवार माघारीच्या अखेरपर्यंत आपला उमेदवारी अर्ज माघारी घेणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Prime Minister K.P. Sharma Oli resigns : नेपाळमध्ये सत्तापालट; पंतप्रधान ओलींचा राजीनामा

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरात राज्यस्तरीय एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; ऑफिसर पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Koli Community : कोळी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करा; महादेव, मल्हार कोळी समाज आक्रमक

गोकुळचा मोठा निर्णय! लवकरच चीज अन् आईस्क्रीम बाजारात आणणार; शेतकऱ्यांनाही दिलासा

SCROLL FOR NEXT