Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : वाईन शॉप हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन; दुकानाचा फाडला बोर्ड

Dhule News : आझाद समाज पार्टीच्या वतीने त्याचबरोबर इतर सामाजिक संघटनांच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून हे वाईन शॉप हटवण्याची मागणी सातत्याने प्रशासनाकडे केली जात

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूस असलेले वाईन शॉप हटवण्याच्या मागणीसाठी आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते (Dhule) आक्रमक झाले. हे शॉप हटविण्यासाठी आंदोलन करत दुकानाचे बोर्ड फाडत घोषणाबाजी केली. (Live Marathi News)

आझाद समाज पार्टीच्या वतीने त्याचबरोबर इतर सामाजिक संघटनांच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून हे वाईन शॉप (Wine Shop) हटवण्याची मागणी सातत्याने प्रशासनाकडे केली जात आहे. परंतु या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप लावत आझाद समाज पार्टीच्या आंदोलकांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर आंदोलन करत घोषणाबाजी केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत वाईन शॉपचा बोर्ड फाडत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या संतप्त आंदोलकांना पोलिसांनी (Police) तात्काळ ताब्यात घेतले. यामुळे यावेळी परिसरात तणावाचे वातावरण देखील निर्माण झाल्याचे बघावयास मिळाले. आता या वाईन शॉप संदर्भात प्रशासन काय भूमिका घेणार हे बघणं अवचित्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं; शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरला

Andheri Pedestrian Bridge: रेल्वेच्या पादचारी पुलावर महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी; मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

SCROLL FOR NEXT