Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: कर्नाटक विजयानंतर काँग्रेसचा फटाके फोडून जल्लोष

कर्नाटक विजयानंतर काँग्रेसचा फटाके फोडून जल्लोष

भूषण अहिरे

धुळे : कर्नाटक विजयाचे फटाके धुळ्यात विविध ठिकाणी फुटताना बघायला मिळाले आहेत. कर्नाटक (Karnataka) येथे काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशानंतर शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील बाभळे फाटा या ठिकाणी देखील काँग्रेसच्या (Congress) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून त्याचबरोबर एकमेकांना पेढे भरवत काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष साजरा केला आहे. (Tajya Batmya)

कर्नाटक राज्‍यात झालेल्‍या निवडणूकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात राज्‍यात सत्‍तांतर होवून कॉंग्रेसने विजय मिळविला. भाजपला येथे पराभव स्‍वीकारावा लागला आहे. या विजयानंतर देशभरात कॉंग्रेसकडून जल्‍लोष करत आनंदोत्‍सव साजरा केला. त्‍यानुसार धुळ्यात (Dhule) देखील कॉंग्रेस पदाधिकारींनी जल्‍लोष केला.

भाजपला असाच धोबीपछाड देवू

काँग्रेसच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केल्याचे बघायला मिळाले आहे. यावेळी आगामी निवडणुकांमध्ये अशाच प्रकारे भाजपला काँग्रेसतर्फे धोबीपछाड देण्यात येईल; असा विश्वास देखील काँग्रेसच्या जल्लोषकर्त्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT