Drink and drive
Drink and drive 
महाराष्ट्र

Dhule : जिल्ह्यात २०६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

साम टिव्ही ब्युरो

धुळे : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ अंतर्गत शहरासह जिल्ह्यात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मद्यपान करून वाहने चालवीत स्वतःसह दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जिल्ह्यातील २०६ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी (Police) डिसेंबरमध्ये कारवाई केली. नोव्हेंबरमध्ये ही संख्या १४८ च्या घरात होती. नववर्षानिमित्त ही विशेष मोहीम राबविली. ती पुढेही सुरूच राहणार आहे. (Dhule news Action taken against 206 drunk drivers in the district)

वेगवेगळ्या भागांत होणाऱ्या‍ अपघातांमध्ये मद्यपान करून वाहने चालविण्याऱ्‍यांचे प्रमाण लक्षणीय आहे. यामुळे गंभीर अपघात (Accident) होऊन संबंधित वाहनचालकांसह इतरांचा जीवही जाण्याची दाट शक्यता असते. या पार्श्‍वभूमीवर अपघात रोखण्याचा आदेश पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील व अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यानुसार शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण पोलिसांकडून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.

दोन महिन्‍यात ३५४ कारवाई

रात्रीच्या वेळी शहराच्या विविध रस्त्यांवर विशेष मोहीम राबवून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ (Drink and drive) अंतर्गत नोव्हेंबर २०२१ मध्ये १४८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यात आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक २७, त्यापाठोपाठ धुळे तालुका १८ तर शहर वाहतूक शाखेच्या अखत्यारीत १७ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली. तसेच डिसेंबर २०२१ मध्ये २०६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली. देवपूर पश्‍चिम पोलिस ठाण्याअंतर्गत सर्वाधिक २८, शहर वाहतूक शाखेच्या हद्दीत २१, तर चाळीसगाव (Chalisgaon) रोड पोलिस स्टेशन अंतर्गत १७ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली.

जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांकडून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई सुरू आहे. कारवाई करून त्यांच्यावर न्यायालयात खटले दाखल झाले आहेत. शहरात सहाय्यक पोलिस निरीक्षक संगीता राऊत, प्रवीण नागरे, अतुल पवार, मतीन शेख, रवींद्र ठाकरे, प्रसन्न पाटील, उमाकांत खापरे, धोंडिराम मुड्डे, दीपक दामोदर, मनोहर महाले, जितेंद्र आखाडे आदींच्या पथकाने कारवाई केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT