Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: पोलिसांना चकवा देत होता फरार; अखेर परभणी येथून आरोपी ताब्‍यात

पोलिसांना चकवा देत होता फरार; अखेर परभणी येथून आरोपी ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : गेल्या काही महिन्यांपूर्वी धुळे तालुका पोलिसांनी केलेल्या अवैध दारू वाहतुक कारवाई दरम्यान फरार (Dhule) आरोपीच्या पोलिसांनी मुसक्‍या आवळल्‍या आहेत. धुळे तालुका पोलिसांनी मोठ्या शिताफीने परभणी (Parbhani) आरोपीला पकडले आहे. (Live Marathi News)

धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गेल्या काही महिन्यांपूर्वी अवैध दारूविरोधी कारवाई करण्यात आली होती. या कारवाई दरम्यान जवळपास दहा आरोपी निष्पन्न झाले होते. यानंतर नऊ आरोपींचा धुळे तालुका पोलिसांनी (Dhule Police) तपास करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. परंतु यातील मुख्य आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला होता. तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्या मोबाईलचे सिम व मोबाईल वेळोवेळी बदलून पोलिसांना चकवा देत होता.

खात्रीलायक माहितीवरून रचला सापळा

दोन दिवसांपूर्वी सदर आरोपी हा परभणी येथे असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर धुळे तालुका पोलिसांनी परभणी येथून या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपीला धुळे तालुका पोलीस (Police) ठाण्यात आणून त्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे. आरोपी विरोधामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची देखील माहिती असून इतर गुन्ह्यांमध्ये देखील हा आरोपी फरार असल्याचे उघडकीस आल्याने या संदर्भातील संपूर्ण तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IAS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात पुन्हा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात...

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला; 45 लाखांची लाच घेताना बड्या सरकारी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडला

Health Tips : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? ९९% लोकांना माहितीच नाहीत

Toothache Remedies : तुमची दाढ सुन्न पडते? आजीच्या बटव्यातील 'हे' रामबाण उपाय घरच्याघरी करा

SCROLL FOR NEXT