Accident  Saam tv
महाराष्ट्र

वऱ्हाड्यांच्या गाडीचा अपघात; पंधरा जण जखमी

लग्नाचे वऱ्हाड असलेल्‍या आयशरला अपघात; पंधरा जण जखमी

भूषण अहिरे

धुळे : धुळे तालुक्यातील वडेल येथून कंचनपूर येथे लग्नासाठी वऱ्हाड घेऊन निघालेल्या आयशर गाडीला धुळे ते शिरपूर महामार्गावर तिसगाव ढंडाने फाट्याजवळ भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात दहा ते पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पुरुषांसह महिला व बालकांचा (Dhule News) देखील समावेश आहे. (dhule news Accident to truck the bridegroom people injured)

धुळ्याकडून शिरपूरकडे (Shirpur) भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने सदर वाहनाला उजव्या बाजूने धडक दिली. या अपघातात दहा ते पंधरा वऱ्हाडी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सोनगीर टोल येथील रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात (Hospital) पाठविण्यात आले. अपघात झाल्याचे लक्षात येताच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी व परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत बचाव कार्य करण्यास मदत केली आहे.

सुर्देवाने मोठी दुर्घटना टळली

वऱ्हाडी नेत असलेल्‍या आयशर ट्रकला झालेला अपघात ओव्हरटेक करण्याच्या नादात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात महामार्ग पोलीस त्याचबरोबर धुळे तालुका पोलीस पुढील तपास करीत आहेत. सुर्देवाने या अपघातात जीवितहानी टळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

Weather Update: अचानक गायब झालेला मान्सून धो धो बरसतोय! कोणत्या जिल्ह्यांना धोका?

Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

SCROLL FOR NEXT