महाराष्ट्र

थरारक..सुसाट कार झाली पलटी, त्यावर चढला ट्रक; तिघांचा मृत्यु

थरारक..ओव्हरटेक करत सुसाट कार झाली पलटी, त्यावर चढला ट्रक; तिघांचा मृत्यु

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरारक घटना घडली. सुसाट कार गाड्या उडवत गेली अन पलटी झाली. त्या कारवर ट्रक चढला व मागुन आठ ते दहा वाहने एकमेकांवर धडकले. या भीषण अपघातात तीन जण ठार झाले. (dhule-news-accident-news-mumbai-aagra-highway-bijasan-ghat-car-truck-accident)

सदर अपघात बुधवारी (ता. 27) रात्री साडेआठच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील बिजासनी घाट ते पळासनेरदरम्यान भिलटदेवजवळ घडला. अपघातात तीन ते चार जण गंभीर जखमी झाले.

कारमधील तिघे ठार

सदर अपघातात कार पूर्णतः चेपली गेली. कारमधील तीन जण ठार झाले असून एक गंभीर जखमी आहे. मृत व जखमी पुरुष आहेत. कारच्या नंबर प्लेटचा भुगा झाल्याने कार व प्रवाशांविषयी माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

सुसाट कारमुळे अपघात

मध्यप्रदेशाकडून धुळ्याकडे येणाऱ्या बॅलेनो कार प्रचंड वेगाने एकेका वाहनाला ओव्हरटेक करीत पुढे शिरली . यात ताबा सुटल्याने कार पलटी झाली आणि हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावर एका बाजूची वाहतूक खंडित झाली असून ती दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

SCROLL FOR NEXT