धुळे : शहरातील ७० हजार नागरिक अद्यापही कोविड लसीकरणाच्या पहिल्या डोसपासून, तर एक लाख ५७ हजार नागरिकांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नसल्याची बाब समोर आली आहे. दुसरीकडे कोरोनाबाधितांची (Corona Patient) संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने (Dhule Corporation) केले आहे. (dhule-news-70-thousand-citizens-away-from-vaccines-in-Dhule)
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना व ओमिक्रॉनच्या (Omicron) नियंत्रणासाठी ‘हर घर दस्तक’ मोहिमेंतर्गत १०० टक्के लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश आहेत. मात्र, या मोहिमेला धुळे शहरात अल्प प्रतिसाद मिळत आहे. आजच्या घडीला धुळे (Dhule) शहारात ७० हजार नागरिकांचा लशीचा पहिला डोस (Corona Vaccination) प्रलंबित आहे, तर एक लाख ५७ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप पहिला डोसही घेतलेला नाही, त्यांनी तत्काळ महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी. तसेच ज्या नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांनी लसीकरणाच्या शेड्यूलनुसार तत्काळ लस घ्यावी. ज्यातून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून नागरिकांचा बचाव होईल, असे महापालिकेने म्हटले आहे.
अन्यथा दंड
नागरिकांनी बाजारपेठ, दुकाने, व्यापारी संकुलांमध्ये गर्दी करू नये. आस्थापनांमध्ये ‘नो मास्क नो एन्ट्री’ वापर करावा. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, आस्थापनांमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करावी, तसेच रस्त्याच्या कडेला किंवा वाहनावरून ये-जा करताना रस्त्यात थुंकू नये. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मंगल कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना मास्कचा वापर अनिवार्य करावा. ज्या नागरिकांनी मास्कचा वापर केलेला नाही, त्यांना पाचशे रुपये दंड व मंगल कार्यालयात क्षमतेपेक्षा जास्त नागरिक आढळल्यास मंगल कार्यालय मालकास ५० हजार रुपये दंड असल्याने सर्वांनी कटाक्षाने मास्कचा वापर करावा. शासनाने लग्नसराई, राजकीय व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नियमावली आखून दिली आहे, त्याचे तंतोतन पालन करावे. सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर प्रदीप कर्पे, उपमहापौर भगवान गवळी, स्थायी समिती सभापती संजय जाधव, आयुक्त देविदास टेकाळे आदींनी केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.