Police personnel inspecting the vandalised residence of Shinde Sena candidate in Dhule after a pre-poll attack. Saam tv
महाराष्ट्र

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Dhule Municipal Election Violence: धुळे महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आधीच वातावरण तापले असून शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली.

Omkar Sonawane

भूषण अहिरे,साम टीव्ही

धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या आधीच धुळ्यात वातावरण चांगलेच तापले आहे, धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील शिंदेसेनेचे उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे, घरावर दगडफेक करत खुर्च्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करीत दहशत निर्माण करण्यासाठी भाजपच्या उमेदवारासह गुंडांनी हल्ला केल्याचा शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी आरोप केला आहे,

भाजपाच्या उमेदवार प्रभावती शिंदे यांचे पती विलास शिंदे यांनी हा हल्ला केल्याचा मनोज मोरे यांचा आरोप असून घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले आहेत, घरावर हल्ला करणाऱ्या भाजपच्या उमेदवारा सह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मनोज मोरे यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे.

दरम्यान धुळ्यात 500 हून अधिक मतदान कार्ड एकाच कार्यकर्त्याकडे आढळून आल्यानंतर एम एम पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे सर्व मतदान कार्ड ताब्यात घेऊन, धुळे महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी नितीन कापडणीस यांची भेट घेऊन त्यांच्या टेबलावरच हे सर्व ताब्यात घेतलेले मतदान कार्ड ठेवून या सर्व प्रकाराची माहिती दिली आहे.

त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात पोस्ट कार्यालयातून थेट मतदारांच्या घरापर्यंत पोहोचविले जाणारे सीलबंद मतदान कार्ड आले कुठून असा प्रश्न एम आय पक्षाचे पदाधिकारी ईर्षात जहागीरदार यांनी विचारला आहे.

यावर निवडणूक अधिकारी तथा धुळे महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी तात्काळ या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई देखील करण्यात येईल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे आणि त्यापूर्वीच पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात घडामोडी घडताना दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ममता बॅनर्जी थेट सुप्रीम कोर्टात वकीलाच्या भूमिकेत, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, न्यायालयात काय घडलं? VIDEO

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण; कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल

मोठी बातमी! भाजपने आपले 66 नगरसेवक अज्ञातस्थळी हलवले|VIDEO

राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की लांबणार? शरद पवारांच्या वक्तव्यानंतर नवा ट्विस्ट, VIDEO

काँग्रेसमध्ये गटबाजी, भाजप सत्ता खेचणार?

SCROLL FOR NEXT