प्रदीप कर्पे 
महाराष्ट्र

धुळे महापालिका भाजपचीच..प्रदीप कर्पे यांची महापौर पदी बहुमताने निवड

धुळे महापालिका भाजपचीच..प्रदीप कर्पे यांची महापौर पदी बहुमताने निवड

भूषण अहिरे

धुळे : महापालिकेच्या दुसऱ्या टर्नसाठी महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. धुळे महापालिकेतील महापौर निवडीतही भाजपचा करेक्‍ट कार्यक्रम लागणार का? असा प्रश्‍न सर्वांसमोर होता. मात्र भाजपने महापालिकेवरील सत्‍ता कायम राखत महापौर पदाची धुरा प्रदीप कर्पे यांच्‍याकडे सोपविली आहे. (Dhule-Municipal-Corporation-BJP-Pradip-Karpe-elected-as-Mayor-by-majority)

गेल्या काही महिन्यांपासून महापौर आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायप्रविष्ट असलेल्या महापौर पदासाठी ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर धुळे महापालिका महापौरपदाची निवडणूक प्रक्रीया पार पडली. यामध्ये धुळे महानगरपालिकेत ७४ पैकी ५० नगरसेवक भाजपचे असल्यामुळे संख्येबाबत भाजपचे जास्त आहे. परंतु असे असल तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातर्फे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी तीनही पक्ष मिळून एकच उमेदवार देण्यात आला होता. त्यामुळे भाजपच्या चिंतेमध्ये वाढ झाली. तर भाजपतर्फे प्रदीप कर्पे यांना उमेदवारी देण्यात आली होती. ऑनलाईन निवड प्रक्रीयेत कर्पे यांच्‍या गळ्यात महापौर पदाची माळ पडली.

करेक्‍ट कार्यक्रम लागलाच नाही

सांगली, नगर व जळगाव महापालिकेत महाविकास आघाडीतर्फे भाजपचा करेक्‍ट कार्यक्रम झाला होता. त्‍याच धर्तीवर धुळे महापालिकेत देखील करेक्‍ट कार्यक्रम होणार अशी शक्‍यता वर्तविण्यात आली होती. त्‍या अनुषंगाने महापौर निवडणूक दरम्यान नगरसेवक पळवापळवी होऊ नये; यासाठी भाजपचे सर्व नगरसेवक गेल्या काही दिवसांपासून अज्ञात स्थळी नेण्यात आले आहेत. शिवाय विरोधकांचे नेतृत्‍व भरकटल्‍यामुळे करेक्‍ट कार्यक्रम होवू शकला नाही.

-भाजप-प्रदीप कर्पे (विजयी)..............५०

-काँग्रेस- मदिना पिंजारी.....................१७

-एमआयएम- अन्सारी सईदा इकबाल....०४

-तटस्थ........…..........०२ (शिवसेना,बसप)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT