Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule : धुळे जिल्ह्यातील जलसाठे निम्म्यावर; पाणीबाणीचे संकट उभ राहण्याची भीती

Dhule News : धुळे पाटबंधारे विभाग अंतर्गत लाटीपाडा, मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई, करवंद, अनेर, सोनवद, अक्कलपाडा, वाडी शेवाडी, अमरावती, सुलवाडे हे महत्त्वाचे १२ मध्यम, तर सुमारे ४५ लहान- मोठे लघु प्रकल्प आहेत

भूषण अहिरे

धुळे : वाढत्या उन्हात पाणी टंचाईची भीषणता वाढत चालली आहे. आता धुळे जिल्ह्यात देखील याची दाहकता जाणविण्यास सुरवात झाली असून जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या काही धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर आला आहे. यामुळे आगामी काळात धुळे शहरासह जिल्ह्यात पाणी संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर पावसाचे लवकर आगमन न झाल्यास पाणीबाणीचे संकट उभं राहण्याची भीती आहे. 

धुळे पाटबंधारे विभाग अंतर्गत लाटीपाडा, मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई, करवंद, अनेर, सोनवद, अक्कलपाडा, वाडी शेवाडी, अमरावती, सुलवाडे हे महत्त्वाचे १२ मध्यम, तर सुमारे ४५ लहान- मोठे लघु प्रकल्प आहेत. गेल्या वर्षी दुष्काळाचे चटके सहन कराव्या लागलेल्या धुळे जिल्ह्यात गत हंगामात समाधानकारक पाऊस राहिल्याने जुलै महिन्यातच जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते, प्रकल्प भरल्याने नदी, नाले देखील तुडूंब भरून वाहत होते. नदी, नाल्यांना मोठे पूर देखील आले होते. 

तर आगामी काळात जिल्ह्यात पाणीबाणी 

सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने त्यात वाढ झाल्याने जिल्ह्यातील अनेक नाले अगदी जानेवारीपर्यंत प्रवाहित होते. परंतु एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने जलसाठ्यांमध्ये निम्म्यावर पाणीसाठा ऊरला आहे. यामुळे आगामी काळात धुळे जिल्ह्यात पाणीबाणीचे संकट उभ राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सिंचन क्षेत्रही संकटात 
धुळे जिल्ह्यात गत हंगामात समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील सर्व मध्यम, लघु प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला होता. तर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अक्कलपाडा धरणातील पाणीसाठा ५५ टक्के शिल्लक असून, इतर कमी क्षमतेच्या धरणातील पाणीसाठ्यांची टक्केवारीसुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे या धरण क्षेत्र अंतर्गत असलेले हजारो हेक्टर सिंचन क्षेत्रही संकटात सापडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

HIV Injection Attack : लगीन मोडल्यामुळे संतापला, तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही इंजेक्शन; वाचा सविस्तर

Trending Hairstyles: अस्सल मराठमोळा थाट! पैठणी साडीवर ट्राय करा 'या' 5 ट्रेडिंग हेअरस्टाईल्स

Shocking News: लग्नामध्ये रसगुल्ला खाताना घशात अडकला, पाहुण्याचा तडफडून मृत्यू

Viral Video: केस ओढले, लाथा बुक्क्यांनी मारहाण अन्....; विद्यापीठात विद्यार्थिनींचा राडा

SCROLL FOR NEXT