Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : बसमधून महिलेचे दागिने चोरी; महिला आरोपी मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात

Dhule News : बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची गर्दीचा फायदा घेत पर्स, मंगलपोत लांबविल्याच्या घटना बसस्थानकात घडत असतात. त्यानुसार धुळे बसस्थानकात देखील मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या होत्या

भूषण अहिरे

धुळे : बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशांच्या अंगावरील मौल्यवान दागिन्यांची चोरी होत असल्याच्या घटना गेल्या कित्येक दिवसांपासून बसस्थानकाच्या परिसरामध्ये आढळून येत होत्या. दरम्यान दोंडाईचा बसस्थानक येथे बसमधून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिलेला धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळ्यातून मुद्देमालासह अटक केली आहे. 

बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची गर्दीचा फायदा घेत पर्स, मंगलपोत लांबविल्याच्या घटना बसस्थानकात घडत असतात. त्यानुसार धुळे बसस्थानकात देखील मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या होत्या. दरम्यान काही दिवसापूर्वी रजेसिंग राजपूत आणि त्यांच्या पत्नीने शिरपूरला जाण्यासाठी दोंडाईचा बसस्थानक गाठले. गर्दीत सुरत- शिरपूर बसमध्ये चढताना त्यांच्या बॅगमधून २ तोळ्यांचा सोन्याचा गोफ चोरीला गेल्या होत्या.  

धुळे शहरातून महिला ताब्यात 

दागिने चोरीला गेल्यानंतर राजपूत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार सदर प्रकरणाचा समांतर तपास धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला होता. दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे धुळे शहरातील नगावबारी चौफुली येथे संशयित महिला उषाबाई नारायण रक्षे या महिलेला ताब्यात घेण्यात आले असुन चौकशीत तिने चोरीची कबुली दिली आहे.  

१० ग्रॅम सोन्याचा गोफ जप्त 

सदर महिलेला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली असता चोरीची कबुली दिली. यानंतर तिच्याकडून ९.९५० ग्रॅम सोन्याचा तुटलेला गोफ जप्त करण्यात आल्या आहे. तसेच महिलेविरुद्ध यापूर्वीही चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात पोलीस प्रशासनातर्फे पुढील कारवाई करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

SCROLL FOR NEXT