Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : व्यापाऱ्याला लुटणारे दोघे चोरटे पोलिसांच्या ताब्यात; मुद्देमाल केला हस्तगत

Dhule News : मुंबई- आग्रा महामार्गावरील लळींग घाटामध्ये मालेगाव येथून व्यापाराचे पैसे घेऊन धुळ्याकडे येणाऱ्या एका भंगार व्यापाऱ्यास काही अज्ञातांनी रस्त्यात थांबून बंदुकीचा धाक दाखवून पैशांची लूट केल्याची घटना उघडकीस आली होती.

भूषण अहिरे

धुळे : रस्त्यात व्यापाऱ्याला थांबवून बंदुकीचा धाक दाखवत व्यापाऱ्याचे पैसे लुटल्याची घटना घडली होती. (Dhule) या प्रकरणाचा तपास सुरु असताना लूटमार करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (Crime News) मुसक्या आवळल्या आहेत. (Breaking Marathi News)

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई- आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) लळींग घाटामध्ये मालेगाव येथून व्यापाराचे पैसे घेऊन धुळ्याकडे येणाऱ्या एका भंगार व्यापाऱ्यास काही अज्ञातांनी रस्त्यात थांबून बंदुकीचा धाक दाखवून पैशांची लूट केल्याची घटना उघडकीस आली होती. या संदर्भात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा (Dhule Police) देखील दाखल करण्यात आलेला होता. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या तपासाची चक्रे फिरवली असता मालेगाव येथील दोघा चोरट्यांच्या पोलिसांनी मुद्देमालासकट मुसक्या आवळल्या आहेत.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१ लाख ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

घटनेतील चार आरोपी सध्या फरार असून त्यांचा देखील पोलीस शोध घेत आहेत. या दोघांकडून धारदार शस्त्र त्याचबरोबर या लुटीदरम्यान वापरण्यात आलेले वाहन व मोबाईल त्याचबरोबर या लुटीतील ताब्यात असलेली रोकड असा एकंदरीत जवळपास एक लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास मोहरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT