Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : बँकेतून बाहेर निघताच चोरट्यांनी साधली संधी; वृद्धेचे ३ लाख रुपये लंपास

Dhule News : फिक्स डिपॉझिट ठेवलेले चार लाख रुपये खात्यातून काढून घरून आणलेले तीन लाख व स्टेट बँकेतून काढलेले चार लाख असे एकूण सात लाख रुपये कापडी पिशवीत ठेवले.

साम टिव्ही ब्युरो

धुळे : धुळ्यातील शिवाजीनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या पेन्शनधारक महिला ही बँकेमध्ये ठेवण्यासाठी (Dhule) रोख रक्कम घेऊन जात होत्या. या दरम्यान रस्त्यावरच चोरट्यांनी महिलेजवळ असलेल्या पिशवीत ठेवलेली तीन लाख रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

धुळे शहरातील शिवाजीनगर परिसरातील द्रौपदाबाई बापूराव पाचोरे या कापडी पिशवीत तीन लाख रुपये घेऊन रिक्षाने एसबीआय (SBI) मध्ये गेल्या होत्या. त्यांनी फिक्स डिपॉझिट ठेवलेले चार लाख रुपये खात्यातून काढून घरून आणलेले तीन लाख व स्टेट बँकेतून काढलेले चार लाख असे एकूण (Crime News) सात लाख रुपये कापडी पिशवीत ठेवले. तेथून सात लाखांची पिशवी डाव्या खांद्याला अडकून हस्ती बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवण्यासाठी जात होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान बँकेतुन बाहेर निघाल्यानंतर गेटजवळ पोहचताच अज्ञात चोरट्यांनी शस्त्राच्या सहाय्याने पिशवी कापून पिशवीत ठेवलेली रक्कम चोरली. पिशवी कापलेली महिलेच्या लक्षात अली. पिशवीतील सात लाखांपैकी पाचशे रुपयांचे नोटांचे सहा बंडल असे तीन लाख चोरीस गेल्याचे लक्षात आले. बँक परिसरात वृद्ध महिलेने रिक्षा चालकाच्या मदतीने शोध घेतला. मात्र काहीच मिळून आले नाही. तीन लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आल्याने द्रौपताबाई पाचोरे यांनी पोलिसात तक्रार दिली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT