Crime News Saam TV
महाराष्ट्र

Dhule News : दागिने चोरायला आले अन् लोखंडी कपाट घेऊन पळाले; गरताड गावातील अजब घटना

Gold Jewellery Stolen : सगळ्यातून सावरत मोठ्या चलाखीने ते चोरी करतात. आता देखील चोरीची अशिच एक अतरंगी घटना धुळ्यात घडलीये. चोरट्यांनी फक्त दागिने नाही तर आख्ख कपाट उचलून पळ काढला आहे.

साम टिव्ही ब्युरो

भूषण अहिरे

Dhule News :

धुळे तालुक्यातील गरताड गाव परिसरात राहणाऱ्या एका शेतकऱ्याचे घर फोडून दागिने व रोख रक्कम ठेवलेले कपाटच चोरट्यांनी पळविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान हे कपाट गरताड परिसरातील नरव्हाड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापडले असून, चोरट्यांनी रोख रक्कम आणि दागिने घेवून पोबारा केला आहे.

चोरी करण्यासाठी चोरटे विविध शल्लक लढवतात. वस्तू कशी चोरावी? चोरी करताना आपल्याला कोणी पकडेल का? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या चोरट्यांच्या मनात येत असतात. त्यामुळे या सगळ्यातून सावरत मोठ्या चलाखीने ते चोरी करतात. आता देखील चोरीची अशिच एक अतरंगी घटना धुळ्यात घडलीये. चोरट्यांनी फक्त दागिने नाही तर आख्ख कपाट उचलून पळ काढला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गरताड गाव परिसरात एका शेतकऱ्याच्या घरी धाडसी चोरी झाल्याची घटना सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. शेतकरी नंदलाल वामन पाटील हे आपल्या परिवारासोबत घराला कुलूप लावून धाब्यावर झोपले असता चोरट्यांनी ही संधी साधून या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात शिरकाव केला.

त्यानंतर घरातील लोखंडी कपाटच चोरट्यांनी पळविले आहे. हे कपाट नरव्हाड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांना आढळून आलं आहे. त्या ठिकाणी कपाट तोडून कपाटातून अंदाजे वीस हजार रुपये रोकड दोन तोळेसोन्याचे दागिने, दहा ग्रॅम चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय.

सदर घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक त्याचबरोबर श्वान पथक, ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या घरफोडीमुळे गरताड गाव परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT