Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : एकाच रात्रीत सहा ठिकाणी घरफोडी; दागिने घेऊन चोरटे पसार

Dhule News : शहरात होत असलेल्या घरफोड्यांचे सत्र आता ग्रामीण भागात गेले आहे. चोरट्यानी गावात देखील धाडसी चोरी सुरु केली आहे.

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहराजवळ असलेल्या नगाव गावात चोरट्यांनी एकाच रात्री गावातील तब्बल ६ घरांना टार्गेट केले. यातील दोन घरांमधून चोरट्यांनी सोने- चांदीचे दागिने चोरुन नेले. मात्र उर्वरित चार घरांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच सापडले नसल्याचे समोर आले आहे. 

शहरात होत असलेल्या घरफोड्यांचे सत्र आता ग्रामीण भागात गेले आहे. चोरट्यानी गावात देखील धाडसी चोरी सुरु केली आहे. त्यानुसार धुळे (Dhule) शहराजवळीत नगाव या गावात चोरट्यानी सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला.  एकाच रात्रीत झालेल्या या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली व श्वान पथक त्याचबरोबर इतर तपास यंत्रणांच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. 

परिवार झोपले होते छतावर 
सध्या पावसाअभावी उकाड्याचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिक घराबाहेर अथवा छतावर झोपत आहेत. या संधीचा फायदा (Theft) चोरट्यांनी घेतला व सदर घरांचे कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केला. त्यानंतर छतावर झोपलेल्या कुटुंबीयांपैकी काहीजण सकाळी खाली उतरले असता त्यांना घरात सर्वसामान अस्ताव्यस्त पडल्याच आढळून आले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Acidity : ॲसिडीटीपासून मिळेल त्वरित आराम, फक्त रोज प्या 'हा' एक ज्यूस

शेंगदाणा टाकून अळुचं फतफतं कसं बनवायचं? सोपी रेसिपी| Alu Fadfade Recipe

NEET पेपर फुटी प्रकरणात CBI चा धक्कादायक खुलासा, परीक्षेच्या १० दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका, ५ लाख घेतल्याचं उघड

Maharashtra News Live Update : RTE प्रवेशात मोठा घोळ, ऑनलाइन पोर्टलवर बंद शाळा, पालकांची मात्र धावाधाव

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT