Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : मित्राच्या मदतीने पुतण्याने काकाला संपविले; कोंडाईबारी घाटातील 'त्या' मृतदेहाबाबत धक्कादायक माहिती आली समोर

Dhule News : धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील कोंडाइबारी घाटामध्ये दोन दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी येथील बेपत्ता तरुण सईद शाह चिराग शाह (वय ३२) याचा मृतदेह आढळून आला होता

भूषण अहिरे

धुळे : धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील खोल दरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दारू पिऊन शिवीगाळ करत असलेल्या काकाचा पुतण्याने मित्राच्या मदतीने खून करत हात- पाय बांधून दरीत फेकून दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील कोंडाइबारी घाटामध्ये दोन दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी येथील बेपत्ता तरुण सईद शाह चिराग शाह (वय ३२) याचा मृतदेह आढळून आला होता. मृताच्या तोंडावर कापड, तर हात-पाय दोरीने बांधलेल्या स्थितीत होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने तरुणाचा खून करून फेकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केला होता.

दारू पिऊन करायचा शिवीगाळ

दरम्यान सईद शाह हा दारू पिऊन शिवीगाळ करत असल्याचे मारेकरी पुतण्याने सांगितले आहे. सतत शिवीगाळ करत असल्याने त्याचा राग आल्याने सईद शाह याच्या पुतण्याने मित्राच्या मदतीने काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार सईदला एकटे गाठत त्याला बेदम मारहाण करत त्याचा खून केला. यानंतर त्याचे हातपाय बांधून मृतदेह कोंडाईबारी घाटाच्या खोल दरीत फेकून दिला होता.

साक्री पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व साक्री पोलिसांच्या तपासा दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काका दारू पिऊन शिवीगाळ करत असल्याचा राग अनावर झाल्यानंतर पुतण्यानेच आपल्या मित्राच्या मदतीने काकाला जीवेठार मारले आहे. साक्री पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मारेकरी पुतण्या व त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan : २ लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, पीएम किसान योजनेचे पैसे बंद, तुमचे नाव तर नाही ना?

Maharashtra News Live Update: मुंबईत पाऊस, मुंबईकरांना दिलासा

Pune Nashik Railway: पुणे-नाशिक रेल्वे मार्गात महत्वाचा बदल; ताशी १६० किमी वेगाने होणार प्रवास, कसा असेल संपूर्ण लोहमार्ग?

यंदा 'फादर्स डे' कधी आहे? वडिलांना खूश करणाऱ्या 3 बेस्ट आयडिया

Diabetes: औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज 15 मिनिटं करा हे रुटीन फॉलो, लगेचच मिळेल आराम

SCROLL FOR NEXT