Crime news  Saam Tv
महाराष्ट्र

Dhule News: घरगुती गॅस वाहनांमध्ये भरण्याचा अवैध धंदा; पोलिसांची धडक कारवाई, आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Dhule News: या माहितीच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला

Ruchika Jadhav

भूषण अहिरे

Dhule Crime News:

धुळे शहरामध्ये सध्या अवैधपणे घरगुती गॅस वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरण्याचे अवैध धंदे सुरू आहेत. या विरोधामध्ये आज अप्पर तहसील पथकाने कारवाई केली आहे. आझाद नगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या चार भुजा मार्बल परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळे शहरातील पारोळा रोड बडगुजर पेट्रोल पंपच्या शेजारी असलेल्या चार भुजा मार्बल्स परिसरात अवैधरीत्या घरगुती गॅस सिलेंडर वाहनात भरत असल्याची गुप्त माहिती अप्पर तहसीलदार विनोद पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, त्या ठिकाणी साकीर पिंजारी नामक व्यक्ती हा सदर ठिकाणी अवैधरीत्या गॅस घरगुती गॅस हा वाहनांमध्ये इंधन म्हणून भरत असल्याचे सदर पथकातील प्रमुखांना आढळून आले.

यावेळी सदर ठिकाणी सहा घरगुती गॅस सिलेंडर तसेच एक इलेक्ट्रिक गॅस पंप व एक वजन काटा असे साहित्य देखील आढळून आले आहे. सदर व्यक्तीस तात्काळ आझाद नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात चोरट्यांनी लंपास केले कांदे

चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना आता पुण्यातून चक्क कांदा चोरी झालाय. पारगावच्या ढोबळे मळा येथे शेतकरी खंडू ढोबळे यांनी कांदा साठवून ठेवलेल्या कांद्याची निवड करून बाजारात विक्रीला पाठविण्यासाठी त्यांनी १० पिशव्या कांदा भरून ठेवला होता. रात्रीच्यावेळी चोरट्यांनी बराकीतील या पिशव्या चोरून २५ हजर रुपयांचे नुकसान केले.

याच मळ्यातील दुसऱ्या घटनेमध्ये शेतकरी अजित ढोबळे यांनी बराकीतील कांद्याची निवड करत विक्रीला पाठविण्यासाठी ३० हजर रुपयांचे कांद्याच्या १५ पिशव्या भरून ठेवल्या होत्या त्या देखील चोरट्यांनी लंपास केल्यात. पारगाव पोलीस ठाण्यात या दोन शेतकऱ्यांनी चोरीची तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT