Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : १० मोटरसायकलींसह सराईत चोरटा ताब्यात; धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Dhule News : धुळे शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनेकदा दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. यानंतरही दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. अशात पुन्हा एक दुचाकी चोरटा पोलिसांच्या हाती लागला

भूषण अहिरे

धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पळासनेर परिसरात एका सराईत मोटारसायकल चोरट्याला दहा मोटारसायकलींसह अटक केली आहे. दुचाकीच्या वाढत्या तक्रारींचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चोरटा ताब्यात सापडला आहे. त्याच्याकडून ३ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.  

धुळे शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. पोलिसांकडून अनेकदा दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. यानंतरही दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशात पुन्हा एक दुचाकी चोरटा पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास करण्यात येत आहे.

पळासनेर परिसरातून चोरट्यास अटक 

गमदास उर्फ गमा देवराम भिल असे पोलिसांनी ताब्यात घेत्लेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे. शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथून दीपक नंदू वंजारी यांची दुचाकी चोरी गेली होती. या प्रकरणी पोलिसात दाखल तक्रारीवरून चोरी गेलेली मोटारसायकल आणि इतर गुन्ह्यांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पळासनेर परिसरातून गमदासला ताब्यात घेतले. 

सव्वातीन लाख किमतीच्या मोटारसायकल जप्त 

पोलिसांनी गमदास याची कसून चौकशी केली असता चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी गमदास उर्फ गमा देवराम भिल या सराईत चोरट्याला बेड्या ठोकत त्याच्याकडून ३ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या चोरी केलेल्या दहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार शहरात आजपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

FIFA World Cup 2026 : ४८ संघ, १६ शहरं आणि १०४ सामने...कोण ठरणार विश्वविजेता? चक्रावून टाकणारा अंदाज

Thalapathy Vijay Family Photo: तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या कुटुंबात कोण कोण आहे? जाणून घ्या त्यांच्या परिवाराविषयी

Breaking : कॅबिनेट मंत्री सुधाकर यांचे निधन; फुफ्फुसाच्या संसर्गाशी झुंज ठरली अपयशी, राजकीय वर्तुळावर शोककळा

Cancer Risk: उशिरा गर्भधारणा केल्याने वाढतो 'या' कॅन्सरचा धोका, डॉक्टरांनी सांगितली लक्षणं अन् उपाय

SCROLL FOR NEXT