Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : घरातील रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लांबवीले; धुळे शहरातील रात्रीची घटना

Dhule News : धुळे शहरातील रामदेव बाबानगर परिसरात वास्तव्यास असलेल्या जयस्वाल कुटुंबीय हे नातेवाईकांच्या घरी मुक्कामी गेले होते.

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील रामदेव बाबानगर या ठिकाणी राहणाऱ्या जयस्वाल कुटुंबाच्या घरातून चोरट्यांनी घरी कोणीही नसल्याची संधी साधत कडी कोंडा तोडून चोरी केली. यात चोरट्यानी जवळपास २० हजारांची रोख रकमेसह व सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहेत. 

धुळे (Dhule) शहरातील रामदेव बाबानगर परिसरात वास्तव्यास असलेल्या जयस्वाल कुटुंबीय हे नातेवाईकांच्या घरी मुक्कामी गेले होते. यामुळे त्यांचे घर बंद होते. घराला कुलूप असल्याचे चोरट्यांच्या लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी घरात कोणीही नसल्याची संधी साधली. कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील जवळपास २० हजार रुपयांची रोकड व सोन्या चांदीचे विविध दागिने चोरून पोबारा केला आहे. हा प्रकार (Crime News) परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत कुटुंबियांना माहिती दिली. 

घरात चोरी (Theft) झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जयस्वाल कुटुंबीय लागलीच घरी पोहचले. त्यांनी पाहणी केल्यानंतर दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. यानंतर चोरी संदर्भातील संबंधित पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर आता पोलीस प्रशासनातर्फे या चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतले संत सोपान काका महाराज पालखीचे दर्शन

Beauty Tips : हात-पायांवरील नकोसे केस कमी करण्यासाठी घरच्या घरी करा हे उपाय

ITR Deadline 2026: ३१ जुलैची डेडलाइन चुकली? आता ITR भरताना 'हा' दंड बसणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

ठाकरेंच्या नेत्याची आमदारकी धोक्यात? सर्वोच्च न्यायालयाने दिला अल्टिमेटम, राज्याच्या राजकारणात खळबळ

Pik Vima Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली; जाणून घ्या A to Z माहिती

SCROLL FOR NEXT