Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime News: बापाने मुलाला जीवे मारले; दारू पिऊन करीत होता शिवीगाळ

बापाने मुलाला जीवे मारले; दारू पिऊन करीत होता शिवीगाळ

साम टिव्ही ब्युरो

पिंपळनेर (धुळे) : बसरावळ (ता.साक्री) येथे बापाने रागाच्या भरात २८ वर्षीय मुलाचा लाकडी थापीने (Crime News) खून केला. संशयित बाप रामा कुवर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Tajya Batmya)

बसरावळ (ता.साक्री) शिवारात निमा रामा कुवर यांच्या शेतातील राहते घराचे अंगणात सोमवारी (ता.२४) रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान मुलगा ईलमजी रामा कुवर (वय २८) हा नेहमी प्रमाणे दारू पिऊन वडील रामा धुळ्या कुवर (Dhule News) यांना तो नेहमी प्रमाणे तुम्ही माझ्यासाठी काय कमवून ठेवले आहे. तुम्ही मला काय दिले, असे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होता.

आईने दिली फिर्याद

या कारणावरून वडील रामा कुवर यांनी मुलगा ईलमजी यास जवळच पडलेल्या लाकडी थापीने (धुपाटणे) दोन्ही हातांवर, डाव्‍या डोळ्यावर, डाव्या कानावर, डोक्यावर मारहाण केली. यात त्यास गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. आई निमा कुवर यांच्या फिर्यादीवरून रामा धुळ्या कुवर यांना पिंपळनेर पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे हे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात, विदर्भात थंडी कायम

Mumbai Local : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकल सेवा खोळंबली, ठाण्याकडे जाणारी मार्गिका ठप्प

Figs Benefits: सकाळी रिकाम्या पोटी अंजीर खाल्ल्याने शरीराला होतात हे ९ मोठे फायदे

Local Body Election : नाशिकमध्ये ठाकरेंना जोरदार धक्का, हुकमी एक्का भाजपात प्रवेश करणार

Tuesday Horoscope: ४ राशींच्या व्यक्तींना गुंतवणूक ठरेल लाभदायक, पैशाची तंगी होईल दूर, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT