धुळे : फेसबुकवर ओळख करून कॉपर वायर विक्री करण्याच्या नावाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार धुळे तालुक्यात घडला होता. साधारण साडेसहा लाख रुपयात फसवणूक झाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसात फसवणूक करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे.
दोन दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला (Dhule) धुळे तालुक्यातील हेंकळवाडी येथे कॉपर वायर विकण्याच्या बहाण्याने बोलावून लुटल्याची घटनाउघडकीस आली होती. चोरट्यांनी या व्यापाऱ्यांकडून जवळपास सहा लाख ४६ हजार ९०० रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिन्यांसह त्यांच्याकडील रोकड व फोन पे व गुगल पे वरून रक्कम लुटली होती. या संदर्भात संबंधित व्यापाऱ्याने तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने व तालुका पोलिसांनी (Dhule Police) संयुक्त विद्यमाने या चोरट्यांचा शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
४ लाख १५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व तालुका पोलिसांनी या चोरट्यांचा तपास लावला असून त्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून चार लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. त्याचबरोबर या लुटीदरम्यान सहभागी असलेल्या आणखी आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण व तालुका पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.