Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : मारहाण करत बचत गटाच्या पैशांवर डल्ला; टोळीतील दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

Dhule News : ४ एप्रिलला रात्री आकाश कोळी हे बचत गटाचे पैसे गोळा करून जात होते. यावेळी अज्ञात चार जणांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडे असलेले बचत गटांचे पैसै तसेच टॅब घेऊन पोबारा केला होता

भूषण अहिरे

धुळे : महिला बचत गटाचे पैसे गोळा करून जाणाऱ्यांना रस्तात गाठत मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळ असलेली रक्कम घेऊन चोरटे पसार झाले होते. यामध्ये चार जणांचा समावेश होता. दरम्यान बचत गटाच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या टोळीतील दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

धुळे जिल्ह्यात हा प्रकार घडला होता. दरम्यान ४ एप्रिलला रात्री आकाश कोळी हे बचत गटाचे पैसे गोळा करून जात होते. यावेळी अज्ञात चार जणांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडे असलेले बचत गटांचे पैसै तसेच टॅब घेऊन पोबारा केला होता. रात्रीचा अंधार असल्याने आकाश कोळी यांना हे चोरटे हाती लागले नाहीत. यानंतर त्यांनी पोलिसात जात सदर घडल्या प्रकाराची माहिती पोलिसात देत तक्रार दाखल केली. 

दोघेजण पोलिसांच्या ताब्यात 
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लूटमार करणाऱ्या या टोळीतील बादल रमेश रामकोर आणि आनंद श्रावण सोनवणे यांना वरखेडी रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी आपल्यासोबत असलेल्या आणखी साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे. अन्य दोघांचा तपास पोलीस करत आहेत.  

२ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 

दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या पैशातून घेतलेली दुचाकी, तसेच गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडीसह टॅब आणि चोरीच्या पैशातून घेतलेला आयफोन 13 असा एकूण २ लाख ३६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून आणखी तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT