Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

आता धुळ्यात पाच दिवसांआड पाणी; महापौरांचे स्‍पटीकरण

आता धुळ्यात पाच दिवसांआड पाणी; महापौरांचे स्‍पटीकरण

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील पाणी पुरवठ्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. नागरीकांसह विरोधकांनी प्रशासनावर ताशेरे ओढत सत्‍ताधारी भाजपवर निशाणा साधला होता. परंतु, शहराला पाणी पुरवठा होत असलेली पाईप लाईन जुनी असून त्‍यात लिकेज असल्‍याने पाणी पुरवठा उशिराने होत असल्‍याचे (Dhule News) स्‍पष्‍टीकरण महापौर प्रदीप करपे यांनी केले आहे. (dhule corporation news water supply in Dhule for five days mayor pradip karpe)

सध्या धुळ्यामध्ये पाणीप्रश्न चांगलाच तापला आहे. धुळे (Dhule) शहराला तापी नदीमधून (Tapi River) पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु तापी नदीपासून धुळे शहरापर्यंत आलेली पाईपलाईन ही जवळपास ३२ वर्ष जुनी असल्यामुळे या पाईप लाईनमध्ये बऱ्याच ठिकाणी लिकेज होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने पालिका प्रशासनातर्फे या पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळेच धुळेकरांना पाण्यासंदर्भात अडचणींचा सामना करावा लागला असल्याचे महापौर प्रदीप कर्पे यांनी स्पष्ट केले आहे.

रविवारपासून पाच दिवसाआड पाणी

परंतु येत्या 15 तारखेपासून धुळेकरांना पाच दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार असल्याचे देखील महापौरांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांनी सध्या पाण्याच्या मुद्द्यावरून वरून जे प्रश्न उपस्थित केले आहे. त्यापेक्षा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यावर पाठपुरावा करावा जेणेकरून पाणीपुरवठा आणखीनच सुरळीत करता येईल; असा सल्ला देखील महापौर प्रदीप कर्पे यांनी विरोधकांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : चंद्रपूर, गोदिंया, गडचिरोलीला रेड अलर्ट

Bullet Train: मुंबईकर प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबईतील २ मेट्रो बुलेट ट्रेनला जोडणार

MS Dhoni : एमएस धोनी किती कोटींचा मालक?

Shubman Gill : इंग्लंडमध्ये १ कसोटी सामना जिंकला, कॅप्टन गिल थेट रिटायरमेंटबद्दल बोलला

Pro Govinda Season: ३ दिवस रंगणार प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामना; १६ गोविंदा पथकं एकमेकांसमोर उभी ठाकणार

SCROLL FOR NEXT