Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

Dhule Politics : आश्वासनाची पूर्तता न करता भाजपकडून फसवणूक; ठाकरे गट शिवसैनिकांचा महापालिकेवर निषेध मोर्चा

Dhule News : पुढील दोन दिवसांमध्ये धुळे महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. या पाच वर्षांमध्ये सत्ताधाऱ्यांतर्फे धुळेकरांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी केली नाही

भूषण अहिरे

धुळे : महापालिकेच्या सत्तेत आल्यानंतर भाजपने अनेक आश्वासन दिले. परंतु कार्यकाळ संपत आला तरी (Dhule) धुळे महापालिकेवर सत्ता असलेल्या सत्ताधाऱ्यांनी धुळ्याकरांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता (BJP) केली नाही. असे म्हणत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी धुळे महापालिकेवर निषेध मोर्चा काढला. (Tajya Batmya)

पुढील दोन दिवसांमध्ये धुळे महानगरपालिकेच्या (Dhule Corporation) नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. या पाच वर्षांमध्ये सत्ताधाऱ्यांतर्फे धुळेकरांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी केली नाही. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या (Shiv Sena) पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे शिवसेना कार्यालयापासून धुळे महानगरपालिकेवर निषेध मोर्चा काढला. यावेळी ठाकरे गट शिवसैनिकांनी सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत, सत्ताधाऱ्यांनी धुळेकरांची फसवणूक केली असल्याचा आरोप लावला आहे,

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महापौरांना घातला घेराव 

निषेध करत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी महापौर प्रतिभा चौधरी यांना घेराव घातला. तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपतर्फे विविध विकास कामांसाठी निधी आल्या संदर्भात बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या व त्या निधीचा वापर कुठल्या विकास कामांसाठी करण्यात आला याची विचारणा करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT