Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

Dhule: आयुक्‍त दालनाबाहेर ठिय्या; घरकुल योजनेचा हप्‍ता मिळेना

आयुक्‍त दालनाबाहेर ठिय्या; घरकुल योजनेचा हप्‍ता मिळेना

भूषण अहिरे

धुळे : रमाई घरकुल आवास योजनेचा दुसरा हप्ता अद्याप मिळालेला नाही. हप्‍ता मिळाला नसल्‍याने लाभार्थ्यांनी पालिका आयुक्तांच्या कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन केले. (dhule corporation news Gharkul scheme installment not received)

धुळे (Dhule) शहरातील वलवाडी परिसरात प्रभाग क्रमांक एक मधील रमाई आवास योजने मधील लाभार्थ्यांनी धुळे महापालिका (Dhule Muncipal Corporation) आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. रमाई आवास योजनेतील 430 लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला. परंतु दुसरा हफ्ता पालिका प्रशासनातर्फे पाच ते सहा महिने उलटले तरी देखील अद्यापही देण्यात आला नाही.

घराचे काम रखडले

लाभार्थ्यांचे घराचे काम भर उन्हाळ्यामध्ये रखडले असून या लाभार्थ्यांना भर उन्हात झोपडी करून राहण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीमध्ये पालिका प्रशासनातर्फे आगामी काही दिवसात रमाई घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्यांना दुसरा हप्ता लवकरात लवकर वितरित करण्यात आला नाही; तर पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा गंभीर इशारा त्रासलेल्या लाभार्थ्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे लाभार्थ्यांपैकी कोणालाही त्रास झाला तर त्यास पूर्णपणे जिम्मेदार हे पालिका प्रशासन राहील असे देखील या आंदोलनकर्त्या लाभार्थ्यांनी या आंदोलनादरम्यान स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : नवरा गाढ झोपेत, बायको दबक्या पावलाने आली अन् अंगावर ओतलं उकळतं पाणी; धक्कादायक कारण समोर

Meenatai Thackeray Statue: हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे संतापले

Dharashiv : मुसळधार पावसाने नद्यांना महापूर; चांदणी नदीच्या पुरात तरुण वाहिला, पोलिसांना वाचविण्यात यश

Stray Dogs: आता कुत्र्यालाही जन्मठेपेची शिक्षा होणार, या राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Narendra Modi: सामान्य चहावाला ते देशाचे पंतप्रधान, नरेंद्र मोदींचे हे फोटो पाहिलेच नसतील

SCROLL FOR NEXT