Dhule Breaking News: Saamtv
महाराष्ट्र

Dhule Accident News: रविवार ठरला अप'घात' वार! धुळ्यातील सिंदखेडा तालुक्यात भीषण अपघात; ५ जण जागीच ठार

Dhule Breaking News: शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि ईको गाडीची समोरासमोर धडक झाली. या भयंकर अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Gangappa Pujari

भूषण अहिरे, धुळे|ता. १५ सप्टेंबर

Dhule Hit And Run News: धुळ्यामधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि ईको गाडीची समोरासमोर धडक झाली. या भयंकर अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून भयंकर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून भीषण अपघातांचे सत्र सुरु आहे. शनिवारी (ता. १४) छत्रपती संभाजीनगरमध्ये मद्यधुंद तरुणांच्या स्कॉर्पिओने एका कारला चिरडल्याची घटना घडली होती. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. ही भयंकर घटना ताजी असतानाच आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) धुळ्यामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.

समोर आलेल्या माहितीनुसार, वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून ही सर्व मंडळी इको व्हॅनमधून आपल्या घराकडे परतत होते. यावेळी दसवेल फाट्याजवळ भरधाव पिकपने त्यांच्या व्हॅनला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत पाच जण जागीच ठार झाले आहेत, तर चार जण गंभीर जखमी झालेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही धडक इतकी भयंकर होती की दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, पिकअप वाहनाचा चालक हा मद्यधुंत अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या भयंकर घटनेने धुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात अश्वक्रीडेदरम्यान अपघात

Nauvari Saree Draping: नऊवारी नेसायला जमत नाही? मग सुंदर मराठमोळ्या लूकसाठी 'या' सोप्या पद्धतीने नेसा नऊवारी

Green Tea Benefits : वजन कमी करण्यापासून ते आजारांशी दोन हात करेपर्यंत...; 'हे' 2 पदार्थ मिसळून ग्रीन टी पिण्याचे ६ जबरदस्त फायदे

Male Birth Control Pill: आता पुरूषांसाठी देखील गर्भनिरोधक गोळी, कशी करते काम? वाचा सविस्तर...

Chemical Free Facewash For Pimple And Dark Spots: पिंपल्स आणि काळ्या डागांवर सोपा घरगुती उपाय, घरच्या घरी बनवा केमिकल फ्रि फेसवॉश!

SCROLL FOR NEXT