BJP Victory Saam tv
महाराष्ट्र

BJP Victory : भाजपकडून विजयाचा जल्लोष; धुळे, बीडमध्ये फटाके फोडून केला आनंदोत्सव साजरा

Dhule Beed News : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ व तेलंगणा या राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निकालात तेलंगणा वगळता तिन्ही राज्यात भाजपने विजय प्राप्त केला आहे

भूषण अहिरे, विनोद जिरे

धुळे/बीड : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत (BJP) भाजपने तीन राज्यात निर्विवाद वर्चस्व राखत विजय प्राप्त केला आहे. या विजयाचा जल्लोष भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला. फटाके फोडून हा जल्लोष साजरा करण्यात आला. (Latest Marathi News)

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ व तेलंगणा या राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निकालात तेलंगणा वगळता तिन्ही राज्यात भाजपने विजय प्राप्त केला आहे. या निकालामध्ये भाजपला मिळालेल्या यशाचे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व (Dhule) एकमेकांना पेढे भरवत विजयी उत्सव साजरा केला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळ्यात विजयी घोषणा 

भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयाचा उत्सव साजरा करीत असतांना महिला पदाधिकाऱ्यांनी देखील फुगडी खेळत विजयी उत्सव साजरा केला. भाजपच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून जल्लोष साजरा करताना मोठ्या प्रमाणात विजयाच्या घोषणा देखील दिल्या आहेत.

बीडमध्ये फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंद 
तीन राज्यात भाजपाची सत्ता स्थापन झाल्यानंतर बीडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर जल्लोष केला आहे. फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी ढोल ताशाच्या गाण्यावर ठेका देखील धरला. या निकालावरून आगामी काळातील चित्र स्पष्ट झाले असल्याचं म्हणत कार्यकर्त्यांमध्ये हा उत्साह दिसून येतो आहे. हेच चित्र आगामी काळात देशातील सर्व ठिकाणी पाहायला मिळेल असा विश्वास भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT