Petrol Pump Saam tv
महाराष्ट्र

Petrol Pump : पंपावर लागले पेट्रोल संपल्याच्या पाट्या; वाहनधारकांच्या लांबचलांब रांगा

Dhule Akola News : हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशभरात पेट्रोल डिझेल टँकर चालकांनी तीन दिवसाचा संप पुकारला आहे. या संपाचा सर्वाधिक फटका इधन विक्रीवर होण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

धुळे : केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन वाहन कायदा विरोधात ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे (Dhule) सर्व जनमानसावर परिणाम झालेला पाहावयास मिळत आहे. ट्रक चालक मालक संपात सहभागी असल्याने पेट्रोलचा पुरवठा होणार नसल्याच्या कारणाने काल सायंकाळपासून पंपावर पेट्रोल (Petrol) भरण्यासाठी वाहनधारकांची गर्दी झाली आहे. यामुळे आज बहुतांश पंपावर पेट्रोल संपल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. (Live Marathi News)

ट्रक चालक मालक संघटनेने संप पुकारला आहे. यामुळे सर्वच वाहतूक क्षेत्रावर परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. परिणामी विविध ठिकाणी इंधन खरेदी करण्यासाठी नागरिकांची पेट्रोल पंपांवर गर्दी होऊ लागली आहे, धुळे शहरात सकाळी नऊ वाजेपासून गर्दी होण्यास सुरुवात झाली असून जोपर्यंत पेट्रोलचा साठा शिल्लक आहे. तोपर्यंत पेट्रोल पंप (Petrol Pump) सुरू राहणार असून, यानंतर पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ येऊ शकते असा अंदाज विक्रेत्यांतर्फे व्यक्त केला जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अकोल्यात पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा .....
अकोला
: हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशभरात पेट्रोल डिझेल टँकर चालकांनी तीन दिवसाचा संप पुकारला आहे. या संपाचा सर्वाधिक फटका इधन विक्रीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे (Akola) अकोला शहरातील पेट्रोल पंपावर वाहन धारकांच्या इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. रात्रीपासून प्रत्येक पेट्रोल पंपावर अशा रंगाचं रांगा लागल्याचे चित्र अकोला जिल्ह्यात पाहायाला मिळत आहे. मात्र याचाच फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसतांना आपल्याला पाहायला मिळतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT