Dhule Accident Saam tv
महाराष्ट्र

Dhule Accident: दिवाळीच्या तोंडावर कुटुंबावर दुःखाचा डोंगर; अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

Dhule News : मृत्यूची बातमी कळताच सोनगीर ग्रामीण रुग्णालयात नातेवाइकांनी एकच गर्दी केली. शिंदखेडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद

साम टिव्ही ब्युरो

सोनगीर (धुळे) : कामावरून घराकडे परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात (Accident) मोटारसायकलवरील दोन तरुण जागीच ठार झाले. तर एक गंभीर जखमी झाला. (Dhule) ही घटना बाभळे (ता. शिंदखेडा) फाट्याजवळ घडली. (Live Marathi News)

नरडाणा औद्योगिक विकास केंद्रातील बेदमुथा कंपनीतून रात्री सुटी झाल्याने उमेश सुभाष कुवर (वय २९, रा. डोंगरगाव, ता. शहादा, जि. नंदुरबार), निखिल आनंदा पाटील (३०, रा. मांडळ, ता. शिंदखेडा) व अमोल संजय भदाणे (रा. मंगरूळ, ता. अमळनेर, जि. जळगाव) हे तिघे मोटारसायकलने सोनगीरला (Songir) येत होते. मात्र, बाभळे फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने उमेश कुवर व निखिल पाटील जागीच ठार झाले. अमोल भदाणे गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी धुळ्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुटुंबीयांचा आक्रोश 

दिवाळी सण तोंडावर असताना कमावत्या तरुणांचा अपघात झाल्याने त्यांचे कुटुंब शोकसागरात बुडाले. उमेश कुवर येथील बालाजीनगरात राहत होता. त्याच्या मागे दोन वर्षांचा मुलगा, पत्नी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. निखिल पाटील अविवाहित असून, वालखेडा (ता. शिंदखेडा) येथे राहत होता. त्याच्या मागे एक भाऊ, आई असा परिवार आहे. उमेश कुवर व निखिल पाटील यांच्या मृत्यूची बातमी कळताच सोनगीर ग्रामीण रुग्णालयात नातेवाइकांनी एकच गर्दी केली. शिंदखेडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : दिलदार सोनू सूद सोलापुरात येणार, पूरस्तांना दिला मदतीचा हात | VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

BMC Elections : मुंबईसाठी एकनाथ शिंदेंचा ठाणे पॅटर्न, BMC जिंकण्यासाठी शिवसेनेनं काय आखला प्लान? | VIDEO

Maharashtra Flood : पुराने होत्याचं नव्हतं केलं, २ वर्षांची मुलगी अन् १० वर्षांचा मुलगा गेला वाहून, संभाजीनगरवर शोककळा

Mumbai Crime : स्विमिंग पूलमध्ये अल्पवयीन २ मुलींवर लैंगिक अत्याचार, दादरमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT