Dhule News Accident Saam tv
महाराष्ट्र

Breaking News: पुलाचा कठडा तोडत तापी नदीत कोसळला ट्रक; चालक बेपत्‍ता

पुलाचा कठडा तोडत तापी नदीत कोसळला ट्रक; चालक अडकलेलाच

भूषण अहिरे

धुळे : शिरपूर तालुक्यातील सावरदे येथील तापी नदीच्या पुलावरून ट्रक पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात (Accident News) पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ट्रक चालक ट्रकमध्येच अडकला असून त्यामधील वाहकाला मात्र नदीपात्रात असलेल्या मच्छीमारांनी बचाव कार्य करत वाचविले आहे. (Breaking Marathi News)

मुंबई– आग्रा महामार्गावर असलेल्या तापी नदीच्या सावरदे पुलावरून चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यानंतर ट्रक थेट पुलावरून कठडा तोडत नदीपात्रात पडल्याची घटना उघडकीस आली आहे. हा ट्रक कुरकुरे घेऊन मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) दिशेने जात असताना ही घटना घडली आहे.

वाहकाला काढले बाहेर, चालक मात्र अडकलेला

ट्रकमध्ये वाहक व चालक दोघेही असताना वाहकाला नदीपात्रामध्ये असलेल्या मच्छीमारांनी वाचवले आहे. परंतु या ट्रकमध्ये अद्यापही चालक तसाच अडकून असल्याने ट्रक चालकाला देखील वाचविण्याचे काम पोलीस प्रशासनातर्फे व मच्छीमारांतर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxmichya Paulanni : 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट; ईशा केसकरची एक्झिट तर नवीन नायिकेची एन्ट्री, पाहा VIDEO

Cidco Homes : स्वस्तात मस्त! लॉटरी नाही थेट आवडीचे घर, ४५०८ घरे विक्रीसाठी निघाली, सरकारकडून ₹२५०००० ची सब्सिडी

1 कोटीत मिळणार नगरसेवकपद? कुठे लागली नगरसेवकपदाची बोली?

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

पुण्यातील हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; विदेशी महिलांचा बाजार, पोलिसांनी 'असा' उघडा पाडला डाव

SCROLL FOR NEXT