Dhirendra Shastri apologises after controversy over remarks on Chhatrapati Shivaji Maharaj. saam tv
महाराष्ट्र

Dhirendra Shastri: भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो; धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा

Shivaji Maharaj Comment Row: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून झालेल्या वादानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली आहे. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Bharat Jadhav

  • शिवाजी महाराजांवरील वक्तव्यामुळे धीरेंद्र शास्त्री वादात

  • वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावल्याचा दावा

  • भावना दुखावल्यास माफी मागितली

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून वादात सापडलेल्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितीली आहे. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. आपल्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मनापासून माफी मागतो, असं धीरेंद्र शास्त्री म्हणालेत. ज्यांच्या स्वराज्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही हिंदू राष्ट्राचा संकल्प केला, त्यांची अवमानना तर दूरच पण स्वप्नातही कुणी निंदा केली तर ती सहन करणार नाही, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले आहेत.

नागपूरमधील एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांसंबंधी एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी आता त्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण देत माफीनामा सादर केला आहे. काही लोकांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. ज्यांच्या स्वराज्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही हिंदू राष्ट्राचा संकल्प केला, त्यांची अवमानना तर दूरच पण स्वप्नातही कोणी निंदा केली तर ती सहन करणार नाही.

या देशातील प्रत्येक सनातनी आज जिवंत आहे, हिंदुत्वासाठी सजग आहे. तर त्याचे सर्वात मोठं श्रेय हे शिवाजी महाराजांना जाते. जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, ते सर्व आपलेच लोक आहेत. त्यामुळे आपापल्यात वाद घातला तर त्याचा फायदा दुसऱ्यांना होईल. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना मनात दुसरा काहीही विचार नव्हता. गुरुंप्रती शिवाजी महाराजांचा भाव काय होता, संतांच्या प्रती त्यांचा भाव काय होता ते मी माझ्या भाषेत सांगितलं. पण काहींनी त्याचा चुकीचा अर्थ लावला. पण त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेकडून आजपासून सह्यांची मोहीम

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT