DHARMENDRA PRADHAN RESIGNATION IMPACT ON MAHARASHTRA POLITICS saam tv
महाराष्ट्र

प्रधानांचा राजीनामा, महाराष्ट्रात भूकंप?फडणवीस, शिंदेंना दिल्लीत बोलावणं, फडणवीस शिक्षणमंत्री होणार, राऊतांचा दावा

Pradhan Exit Triggers Power Shift Buzz in Maharashtra Politics: दिल्लीत राजीनामा झाला असला तरी त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणाला त्याचे हादरे बसण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून बोलावणं आलंय. राज्यात नेंमक्या काय घडामोडी सुरू आहेत? आणि प्राधानांचा राजीनामा कुणाला भोवणार आणि कुणाला फावणार ? यावरचा हा रिपोर्ट......

Saam Tv

दिल्लीतल्या घडामोडींचा महाराष्ट्रातलीही राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह निर्माण झालीयत. कारण धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे राज्यातही मोठ्या राजकीय बदलांबाबत जोरदार हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय. कारण यावेळी केंद्रात मोठं मंत्रिपद रिक्त झालंय. आणि आणि या चर्चेला बळ देणारं विधान ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलंय. योगायोग म्हणा किंवा दुर्देव पण फडणवीसांची शिक्षणमंत्रिपदावर वर्णी लागू शकते असा दावा राऊत यांनी केलाय.

फडणवीसांना दिल्लीत जबाबदारी मिळणार असल्याचा दावा यापूर्वीच विरोधकांनी अनेकदा केलाय. मात्र तो फडणवीसांनी प्रत्येकवेळी खोडून काढलाय. विशेष म्हणजे प्रधानांच्या राजीनाम्यापूर्वी काही तास आधी पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्तानं महापूजा केल्यानंतर फडणवीसांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलं.

जे दिलं आहे ते उत्तम आहे. चित्त नेहमी समाधानी असू द्यावं असं आपण म्हणतो ना. तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते पाहावे, चित्त असू द्यावे समाधानी.. तसा समाधानी आहे मी. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आपण मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातून जाऊ देणार नसल्याची मिश्कील टिप्पणी केली.

असं असलं तरी फडणवीसांसोबत एकनाथ शिंदेंनाही दिल्लीचं बोलावणं आहे. कारण ठाकरेसेनेतले ६ खासदार शिंदेसेनेत आल्यापासून एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. केंद्राला डीलिमिटेशन विधेयक पारित करून घेण्यासाठी जे संख्याबळ हवंय त्याला शिंदेंनी मोठा हातभार लावलाय. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ त्यांच्यावर खूष असल्याचं बोललं जातंय. आणि आता योगायोगानं केंद्रातील घडामोडींना वेग आल्यामुळे शिंदेंबाबत चर्चांनी जोर धरलाय. असं असलं तरी दिल्लीश्वरांच्या मनात नेमकं काय आहे त्यावर महाराष्ट्रातल्या खुर्च्यांचा खेळ अवलंबून आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा कुणासाठी दुर्देव आणि कुणासाठी सुदैव याकडे साऱ्या राजकीय विश्वाचं लक्ष लागलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजीनामा झाला, सुधारणांचं काय? भ्रष्ट यंत्रणांना आळा कसा घालणार?

GEN Z आंदोलनाला पहिलं यश, लाठ्या-काठ्या खाल्ल्या, मात्र तरुणाईचं जिंकली

CJP च्या ३ मागण्या अन् सरकारची लेखी हमी; ४८ तासांत सरकारचं मन परिवर्तन कसं झालं?

देशातील लोकशाहीने कात टाकली, आंदोलनाच्या यशानंतर पवारांचं मोठं विधान

'Gen Z मैदानात उतरली आणि इतिहास घडला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर बॉलिवूड कलाकारांच्या भन्नाट प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT