Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : रस्त्याचे मोजमाप करताना मजुराचा शॉक लागुन मृत्यू; तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग येथील घटना

Dharashiv News : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गमध्ये ७८ कोटी रुपयांच्या निधीतून बांधकाम विभागाकडुन रस्त्याची कामे होत आहेत.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील जगतापनगर येथे रस्त्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. या कामासाठी सध्या मोजमाप करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान आज हे रस्ता कामाचे मोजमाप करताना कामावर असलेल्या मजुराला विजेचा झटका बसून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

विकास शिवाजी राठोड असे या घटनेत मृत झालेल्या तरुण मजुराचे नाव आहे. तुळजापूर (Tuljapur) तालुक्यातील नळदुर्गमध्ये ७८ कोटी रुपयांच्या निधीतून बांधकाम विभागाकडुन रस्त्याची कामे होत आहेत. या कामाला सुरवात करण्यात आली असून प्रत्यक्षात काम सुरु करण्यापूर्वी संपूर्ण रस्त्याचे मोजमाप केले जात आहे. (Dharashiv News) रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराची माणसे येथे काम करत असून मोजमाप करून आखणी केली जात असताना सदरची दुर्दैवी घटना घडली आहे.  

दरम्यान १० जुलैला विकास राठोड हा रस्त्याचे मोजमाप करत असताना त्याच्या हातातील लोखंडी पट्टीचा वरील विजेच्या ताराशी (Electric Shock) संपर्क झाला. यामुळे विकासचा विजेचा जोरदार झटका बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर बांधकाम विभाग व कंपनीने सुरक्षिततेच्या दक्षता न घेतल्याने ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT