Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : रानडुकराची तस्करीच्या आरोपात तरुणाला कोंडून ठेवत मारहाण; तरुण गंभीर जखमी

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग शिवारात रानडुक्कर हे शेतात लागवड केलेले पिके उध्वस्त करत होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी या रानडुकराचा बंदोबस्त करण्यासाठी कोळी समाजातील तरुणांना बोलावले होते

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : जंगलातून रानडुकराची शिकार करून ताची पर राज्यात तस्करी करत असल्याच्या आरोपावरून तरुणाला वन विभागाने ताब्यात घेत  कोंडून ठेवले होते. इतकेच नाही तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यात समोर आला आहे. 

धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्यातील नळदुर्ग शिवारात रानडुक्कर हे शेतात लागवड केलेले पिके उध्वस्त करत होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी या रानडुकराचा बंदोबस्त करण्यासाठी कोळी समाजातील तरुणांना बोलावले होते. त्यानुसार तरुणांनी डुकराला पकडले होते. यानंतर तरुण हे रानडुक्कर घेऊन जात असताना (Forest department) वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रस्त्यात अडवून डुकराची परराज्यात तस्करी करत असल्याच्या आरोपाखाली वन विभागाच्या ऑफिसला नेत कोंडून ठेवले होते. 

दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवराज कोळी या तरुणाला बेदम मारहाण केली. या तरुणाच्या अंगावर अक्षरशा मोठे वळ दिसत असून या तरुणाकडे यावं अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप देखील तरुणाने केला आहे. तर हे रानडुक्कर मारून हे तरुण परराज्यात तस्करी करत असल्याचा संशय आम्हाला असल्यामुळेच आम्ही ही कार्यवाही केली. मारहाण झाली हा आरोप जरी असला तरी त्याची चौकशी करू असं आश्वासन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सांगलीत एक कोटी 11 लाखांच्या बनावट नोटांसह मुद्देमाल जप्त, पाच जणांना अटक

Rukmini Vasanth: 'कांतारा' चित्रपटात आपल्या दमदार अभियनाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री कोण?

Laughing Benefits: हसल्याने आरोग्याला कोणकोणते फायदे होतात माहितीये का?

Maharashtra Politics : शरद पवारांना धक्का, विश्वासू सहकाऱ्यांने केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुंग्या किती वेळ झोपतात माहितीये का? वेळ ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

SCROLL FOR NEXT