Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : पाणीपुरवठा करणारे प्रकल्प २५ टक्केच भरले; प्रकल्प भरण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतिक्षा

Dharashiv News : धाराशिव शहराला उजनी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र यामध्ये तेरणा व रूईभर येथील प्रकल्पाचाही आधार लागतो

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत ऐकीकडे सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १६१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र जिल्ह्यातील प्रमुख शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पात अद्याप २५ टक्के सुध्दा पाणीसाठा झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प चांगले भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

धाराशिव (Dharashiv News) शहराला उजनी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र यामध्ये तेरणा व रूईभर येथील प्रकल्पाचाही आधार लागतो. उजनी धरणात सध्या ४५.३३ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे धाराशिवला सध्या पाण्याची चिंता नाही. मात्र रुईभर धरण कोरडे असुन तेरणात २१.४८ टक्के पाणीसाठा आहे. तर परंडा येथील सिना कोळेगाव प्रकल्पात मृत साठा आहे. त्यामुळे परंडा शहराला एका दिवसाआड पाणी पुरवठा (Water Supply) केला जात आहे. 

मांजर धरणात अजूनही मृतसाठा 

कळंब शहराला मांजरा प्रकल्पातुन (Manjra Dam) पाणी पुरवठा केला जात असुन धरण मोठे असल्याने पाऊस पाडल्यानंतर देखील यात अजूनही मृत साठा शिल्लक आहे. यामुळे शहराला दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हे सर्व प्रकल्प समाधानकारक भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. चांगला पाऊस पडल्यानंतर हे प्रकल्प भरून पुढील दिवसातील पाणी टंचाईची समस्या मिटणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT