बालाजी सुरवसे
धाराशिव :धाराशिव- परंडा तालूक्यातील देवगाव खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील (Zp School) शौचालयाची भिंत कोसळली. यात दोन मुली जखमी झाल्याची घटना समोर आली. या दोन्ही मुलींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
अनुष्का शिंदे व महेक तांबोळी या दोन्ही जखमी झाल्या आहेत. वडणेर येथील राहणाऱ्या या मुलींच्या पायावर भींत पडल्याने दोन्ही मुलींचे पाय फॅक्चर झाले आहे. परंडा येथे सुविधा नसल्याने पुढील उपचारासाठी दोन्ही मुलींना धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे तालुक्यातील जिर्ण झालेल्या शाळेच्या इमारतीचा विषय समोर येत असुन अशा इमारतीची तात्काळ तपासणी करण्याची मागणी पालकातुन केली जात आहे.
शिक्षक, पालकांची धाव
शाळेची जीर्ण भिंत अचानक पडली. यात दोन मुलींचे पाय दबले गेले होते. यावेळी शिक्षकांनी धाव घेत मुलींना लागलीच बाहेर काढले. पालकांनी जखमी मुलींना तातडीने परंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.