Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Dharashiv News : साठवण तलाव येथे इलेक्ट्रिक सबस्टेशनचे काम सुरु असून त्या कामासाठी बाहेर राज्यातून काही मजूर आले आहेत. त्यातीलच राजेश विश्वकर्मा व अखिलेश गुप्ता हे दोन तरुण पोहण्यासाठी तलावात गेले होते

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : कामानिमित्ताने परराज्यातील काही तरुण तळजापूर तालुक्यात आले होते. यावेळी ते गावाजवळील साठवण तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र पोहत असताना या दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 

धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या परराज्यातील दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. राजेश रमेश विश्वकर्मा (रा.मध्य प्रदेश) व अखिलेश दयाशंकर गुप्ता (रा. उत्तर प्रदेश) अशी मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. या दोघा तरुणांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबियांना या प्रकरणी माहिती देण्यात आली आहे. 

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले 

तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथिल साठवण तलाव येथे इलेक्ट्रिक सबस्टेशनचे काम सुरु असून त्या कामासाठी बाहेर राज्यातून काही मजूर येथे कामासाठी आलेले आहेत. त्यातीलच राजेश विश्वकर्मा व अखिलेश गुप्ता हे दोन तरुण पोहण्यासाठी तलावात गेले होते. पोहत असताना त्यांना तलावाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना बाहेर निघता आले असून पाण्यात बुडून मृत्यू झाले. सदर घटनेची नोंद तमालवाडी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक डिव्हायडरवर लटकला
वाशीम : वाशिमच्या मेडशीजवळ कापसाच्या गठणी घेऊन जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट पुलाच्या डिव्हायडर वर चढत अपघात झाल्याचे घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात ट्रक डिव्हायडरला लटकल्याने ट्रकची नुकसान झाले. मात्र ट्रक मधील चालक आणि क्लीनर यात सुखरूप बचावले. हा ट्रक हैद्राबाद वरून गुजरातला कापसाच्या गठानी घेऊन जात होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रोमहर्षक अंतिम सामना! वर्षानुवर्षांच्या संघर्षानंतर दिल्लीचा ‘दबंग’ विजय; पुणेरी पलटनच्या संस्मरणीय हंगामाचा भावनिक शेवट

Powai Kidnapping Shock: पवईतील अपहरणाचा थरार, रोहितच्या एन्काऊंटरची इनसाईड स्टोरी

नेपाळ, बंगालनंतर आता 'या' देशातील सरकारविरोधात नागरिक उतरले रस्त्यावर; आंदोलनादरम्यान ७०० जणांचा मृत्यू

'सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा फसवलं,कर्जमाफी आश्वासनावर जरांगेंची टीका

Free Mobile Recharge Plan for One Year: मोदींकडून वर्षभर मोबाईल फ्री रिचार्ज? 1 GB डेटाही क्षुल्लक किंमतीत मिळणार?

SCROLL FOR NEXT