Kalamb ATM Robbery News Saamtv
महाराष्ट्र

Dharashiv Crime: चोरट्यांनी कहर केला.. लाखोंची रोकड असलेले एटीएम मशीन पळवले; शहरात खळबळ

Kalamb ATM Robbery News: कळंब शहरातील ढोकी रोडवरील जिजाऊ चौक परीसरातील एटीएम मशिनच चोरट्यांनी पळवून नेले आहे.

Gangappa Pujari

बालाजी सुरवसे, प्रतिनिधी...

Dharashiv ATM Robberry: पैशासाठी चोरटे कोणत्या थराला जातील ह्याचा काही नेम नाही. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळंब शहरातील ढोकी रोडवरील जिजाऊ चौक परीसरातील एटीएम मशिनच चोरट्यांनी पळवून नेले आहे. या मशिनमध्ये 39 लाख रुपयांचा मुद्देमाल होता. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळंब (Kalamb) शहरात जिजाऊ चौक परिसरात बॅंक ऑफ इंडियाचे (Bank Of India) एटीएम आहे. गर्दी आणि वर्दळीच्या ठिकाणी हे एटीएम असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. बुधवारी ( ३०, ऑगस्ट) पहाटे भरचौकातील याच एटीएमवर चोरट्यांनी डल्ला मारला.

रोख रक्कमेसह हे एटीएम मशीन घेवुन हे चोरटे पसार झाले. सकाळी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. मशीमध्ये ३९ लाख इतकी रक्कम असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत तपास सुरू केला आहे.

घटनास्थळी पोलीस व गुन्हे तपासाचे श्वान पथक दाखल झाले आहे. एटीएमध्ये पैसे भरण्याचे काम एजन्सीकडे असते, त्यामुळे नक्की किती रक्कम असावी याबाबत निश्चित आकडा माहित नसल्याचे बॅंक व्यवस्थापकांनी सांगितले आहे. या चोरीची सध्या परिसरात चांगलीच चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maternity Leave : कोणताही नियम महिलेला मातृत्व रजा घेण्यापासून रोखू शकत नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Monalisa Wedding : मोनालिसानं फरमानसोबत पळून जाऊन केलं लग्न, कुंभमेळ्यामुळे रातोरात झाली होती प्रसिद्ध

Grapes Cleaning: तुम्ही द्राक्षे धुवून लगेच खाताय का? व्यवस्थित स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक

Maharashtra Live News Update : पुण्यातील रिंग रोड आणि महामार्गांना अजित पवारांचे नाव द्या,रोहित पवारांची मागणी

Insulin resistance: सतत भूक लागतेय, थकवा येतोय? डायबेटीजचं सुरुवातीची लक्षणं असू शकतं, शरीरातील ५ बदलांकडे दुर्लक्ष करू नका!

SCROLL FOR NEXT