Dharashiv Crime Saam tv
महाराष्ट्र

Crime News: तथाकथित राष्ट्रसंताला पंढरपूरातून अटक; महिलेवर अत्याचाराचा होता गुन्हा

Dharashiv News तथाकथित राष्ट्रसंताला पंढरपूरातून अटक; महिलेवर अत्याचाराचा होता गुन्हा

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : दर्शनासाठी आलेल्या महिलेस खोलीमध्ये बोलावून घेत विनयभंग करुन मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी स्वयंघोषीत राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे याला पंढरपुरातून (Pandharpur) अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार (Police) पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आहे. (Tajya Batmya)

परळी येथील ३५ वर्षीय महिला २८ जुलै २०२२ रोजी मठातील दर्शन मंडपामध्ये बसली होती. या दरम्यान महाराजांनी महिलेस प्रवचन हॉलशेजारील खोलीमध्ये बोलावून घेत महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसात दिली (Crime News) होती. या प्रकरणात अटकही झाली होती. मात्र त्याची जामीनावर सुटका झाली होती. त्यानंतर पीडित भाविक महिलेने न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाच्या आदेशाने तथाकथित राष्ट्रसंत एकनाथ महाराजाला पोलिसांनी पुन्हा एकदा एकदा पंढरपूर येथून अटक केली आहे.

महाराजाचा मोठा भक्त परिवार 

या महाराजाचा भक्त परिवार बराच मोठा असून राज्यातील प्रमुख राजकीय मंडळीसोबत त्याची उठबस आहे. दरम्यान पोलिसांनी कळंब येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी त्यांना १८ ऑगस्टपर्यंत दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT