Kalamb Railway Station Saam tv
महाराष्ट्र

Nanded- Pandharpur Express : नांदेड - पंढरपूर एक्सप्रेसला कळंब रोड स्टेशनवर थांबा; प्रवाशांची होणार सोय

Dharashiv News : मागील काही वर्षांपासून या एक्सप्रेसला कळंब रोड स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. याबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: धाराशिव जिल्ह्यातील कळंब रोड रेल्वे स्टेशनवर दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड- पंढरपूर एक्सप्रेस रेल्वेला थांबा मिळावा अशी अनेक वर्षांपासून मागणी होती. त्यानुसार हा थांबा मंजूर करण्यात आला असून रेल्वे प्रशासनाने थांब्याला प्रायोगिक तत्त्वावर मान्यता दिली असल्याची माहिती धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. हा निर्णय प्रवाशांसाठी सोयीचा ठरणार आहे. 

दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड – पंढरपूर एक्सप्रेस नांदेड वरून सुटल्यानंतर कळंब रोड रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आलेला नव्हता. यामुळे येथून पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत होते. यासाठी मागील काही वर्षांपासून या एक्सप्रेसला कळंब रोड स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. याबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. 

११ ऑगस्टला रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी 

यानंतर कळंब रोड रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे कळंब तालुक्यातील प्रवाशांची दिर्घकाळीन मागणी अखेर पूर्ण झाली आहे. रेल्वे बोर्डाने ११ ऑगस्टला अधिकृत आदेश काढून ही मान्यता दिली आहे. याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. या थांब्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

प्रवाशांच्या प्रतिसादावर पुढील निर्णय 
रेल्वे प्रशासनाने या थांब्याला प्रायोगिक तत्त्वावर मान्यता दिली असून लवकरच अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान या काळात तिकीट विक्री व प्रवाशांचा प्रतिसाद यावर देखरेख ठेवून रेल्वे प्रशासनाकडून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मात्र या निर्णयाने कळंब परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, शेतकऱ्यांना बाजारपेठेतील व्यवहारासाठी, तसेच पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांना या थांब्यामुळे मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Manoj Jarange: रक्ताने रंगवलेलं पिंपळपान: मनोज जरांगे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच चित्रात|VIDEO

Manoj Jarange : ४ दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगेंची प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिले महत्त्वाचे अपडेट; VIDEO

Manoj Jarange Protest: कोर्टाचा अल्टिमेटम; आझाद मैदानावर जरांगेंच्या आंदोलनातून हायव्होल्टेज ड्रामा

SCROLL FOR NEXT