Nana Patole Saam tv
महाराष्ट्र

Nana Patole News: पोपटाच्या टीकेला किंमत देत नाही; नाना पटोलेंची चंद्रशेखर बावनकुळेंवर नाव न घेता टीका

पोपटाच्या टीकेला किंमत देत नाही; नाना पटोलेंची चंद्रशेखर बावनकुळेंवर नाव न घेता टीका

साम टिव्ही ब्युरो

बालाजी सुरवसे

धाराशिव : टीका करणारे पोपट असून पोपटाच्या टिकेला जास्त महत्व देण्याची गरज नाही; ते काहीही बोलत असतात. त्यामुळे (Congress) काँग्रेस व मी त्याला जास्त महत्व देत नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर नाव न घेता केली आहे. (Tajya Batmya)

बिहारच्या पाटण्यामध्ये विरोधी पक्षाची जी बैठक होत आहे. ती बैठक काँग्रेस पुढच्या पिढीची भवितव्याच्या चिंतेतून ते एकत्र येत असल्याची टीका (BJP) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या बैठकीवर केली होती. त्याला उत्तर देताना नाना पटोले यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा पोपट असा उल्लेख केला आहे. नाना पटोले हे आज तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे.

प्रदेशाध्यक्ष बदलाच्या बातम्या भाजपने उडविलेली अफवा

काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्ष बदलाच्या बातम्या या भारतीय जनता पार्टीने मीडियाच्या माध्यमातून उडविलेली अफवा असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. राज्यात अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न असून त्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप मीडियाच्या माध्यमातून अशा बातम्या पेरत आहे. तरीदेखील याचा निर्णय हायकमांड घेतील; असे नाना पटोले म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Things You Should Never Give to Others: या 5 गोष्टी चुकूनही दुसऱ्याला देऊ नका

Maharashtra News Live Update: पवई IIT च्या गेटवर युवक काँग्रेसकडून आंदोलन

5 Gram Gold Mangalsutra: 5 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT