Laxman Hake Saam tv
महाराष्ट्र

Laxman Hake News : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला फक्त ब्राह्मण म्हणून विरोध का?; लक्ष्मण हाके यांचा सवाल

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार डॉ. स्नेहा सोनकाटे यांच्या प्रचारासाठी प्रा. लक्ष्मण हाके यांची बेंबळी येथे प्रचार सभा

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : देवेंद्र फडणवीस यांच्यातील क्षमता पहा. ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्या मुख्यमंत्री पदाला विरोध का? असा सवाल ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला. तुळजापूर येथे झालेल्या प्रचार सभेनंतर माध्यमांशी संवाद साधताना हाके बोलत होते. 

धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार डॉ. स्नेहा सोनकाटे यांच्या प्रचारासाठी प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांची बेंबळी येथे प्रचार सभा पार पडली. या सभेनंतर माध्यमांशी ते बोलत होते. प्रा. हाके यांनी सकाळीच ओबीसींचा महायुतीला पाठींबा राहणार असल्याचा दावा केला होता. यानंतर फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या क्षमतेवर बोलत महायुतीलाच पाठींबा असल्याचे स्पष्ट केले आहे. 

दरम्यान जिथे वंचितचा उमेदवार नाही. ओबीसी आरक्षणाच्या विचाराचा उमेदवार नाही, तिथे एक वेळेस भाजपला मतदान करू. मात्र शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही; असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांचं आंदोलन मोठं केल्याचे हाके म्हणाले. महाराष्ट्रात ओबीसीचे २५ आमदार सत्तेत असतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT