Dharashiv Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv Bribe Case : गुन्ह्यातील ट्रॅक्टर सोडविण्यासाठी १५ हजाराची लाच; २ पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Dharashiv News : येरमाळा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रकाश चाफेकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील चालक महेश सांगळे या दोघांना अटक करण्यात आली

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : पोलीस ठाण्यात जप्त केलेले गुन्ह्यातील ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पोलीस हवालदारांनी पैशांची मागणी केली. यानुसार तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदारासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. 

येरमाळा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रकाश चाफेकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील चालक महेश सांगळे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेला ट्रॅक्टर येरमाळा (Police) पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आला होता. हा ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पोलिसांनी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. 

पोलिसांनी मागणी केलेल्या पैशांची रक्कम देण्यास तक्रारदाराला मान्य नव्हते. याबाबत एसीबीकडे (ACB) तक्रार दिली होती. या तक्रारीची तपासणी करून एसीबीने सापळा रचला. त्यानुसार तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची (Bribe) लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असुन तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल दाखल करण्यात आल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT