Ashwini Paul Sucide Naldurg Fort News Saam tv
महाराष्ट्र

Shocking : धक्कादायक! महाराष्ट्राच्या कुस्तीपटूने आपल्या ३ मुलांसह आयुष्याचा दोर कापला; कारण समोर

Dharashiv Wrestler Ashwini Paul Sucide Update News : नळदुर्ग किल्ल्यावर कुस्तीपटू अश्विनी पौळ आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक मुलगी गंभीर जखमी आहे. घटनेमागील कारणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • धाराशिवच्या नळदुर्ग किल्ल्यावर धक्कादायक घटना

  • राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी पौळ आणि त्यांच्या ३ मुलांसह केली आत्महत्या

  • त्यांची एक मुलगी वीरा गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु

  • पोलीस तपास सुरु

धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका महिलेने आपल्या दोन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही महिला राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारी कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ असल्याचे उघडकीस आले आहे. या दुर्घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा मृत्यू झाला. अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींमध्ये क्रांती हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दुसरी मुलगी वीरा गंभीर जखमी आहे. तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अश्विनी यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला? त्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ

मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी पौळ यांची कुस्ती क्षेत्रात वेगळी ओळख होती. ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदकांची कमाई केली होती. त्यांच्या या यशामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. तसेच त्या मुंबईतील महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत होत्या. अलीकडे ३ ते ४ महिन्यांपूर्वी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता आणि त्या आपल्या मुलांना घेऊन माहेरी राहत होत्या.

आत्महत्येमागचं धक्कादायक कारण

अश्विनी यांच्या वडिलांच्या आरोपानुसार, अश्विनी यांना त्यांच्या त्यांच्या पतीसह सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याच जाचातून कंटाळून अश्विनी यांनी ३ ऑगस्ट रोजी नळदुर्ग किल्ल्याच्या बुरुजावरून त्यांनी आपल्या ३ मुलांसह स्वतःच आयुष्य संपवलं. असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. दरम्यान या दुर्घटनेत अश्विनी यांच्या २ मुलांचा मृत्यू झाला असून १ मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

पोलीस तपास सुरु

क्रीडापटूच्या आयुष्याचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने क्रीडा क्षेत्रासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अश्विनी यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी केली जात असून, तपासातून घटनेमागील सत्य समोर येण्याची शक्यता आहे. एका कर्तृत्ववान महिला खेळाडूचा आणि तिच्या तीन चिमुकल्या मुलांचा झालेला हा दुर्दैवी अंत अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. कौटुंबिक संघर्ष, मानसिक तणाव आणि महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या घटनेची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SSR : मतदार यादीतील SSR प्रक्रिया नेमकी काय असते? जाणून घ्या सविस्तर

खासगी रुग्णालयांसाठी नवे नियम, राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय; काय आहेत नियम? जाणून घ्या

बनावट कागदपत्रे, खोटे दस्तऐवज अन् लाखोंची उकळणी! बनावट कॉल सेंटरमधून अमेरिका-कॅनडातील नागरिकांची आर्थिक फसवणूक

दसऱ्याच्या सुट्ट्या वाया घालवू नका, लॉंग वीकेंडवर भारतातील 'या' 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Maharashtra drought news: IAS आणि IPS अधिकारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार एक दिवसाचा पगार

SCROLL FOR NEXT