dharashiv saam tv
महाराष्ट्र

Dharashiv Crime News : वानरास काठीने मारहाण करणे पडले महाग, ग्रामस्थाची पाेलीस काेठडीत रवानगी

संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Siddharth Latkar

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात दगावलेल्या वानराची अंत्ययात्रा काढत पारगावकरांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. एकाने वानरास काठीने मारल्याने त्याचा मृत्यू झाला हाेता. या प्रकरणी संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. (Maharashtra News)

धाराशिव जिल्ह्यातील पारगाव येथे गावातील बसस्थानक परिसरात बसरेल्या एका वानराच्या डोक्यात दारुच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने काठी मारल्याने वानराचा मृत्यू झाला होता. गावकरी जमा होताच वानराला मारणाऱ्या माथेफिरूने तिथुन पलायन केले होते.

गावकऱ्यांनी आपली दुकाने बंद करत वाजत गाजत या वानराची अंत्ययात्रा काढुन अंत्यसंस्कार केले. दरम्यान निर्दयीपणे वानराचा जिव घेतल्याप्रकरणी दिलीप डोके यास वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

त्यास भुम येथील न्यायालयासमोर (court) हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी (villagers) केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FDAची मोठी कारवाई; ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात १० टन पनीर, खवा जप्त

Weather Update: उन्हाच्या तडाख्यात 9 राज्यात पाऊस घालणार धुमाकूळ, कोणत्या राज्यांसाठी हवामान विभागानं दिला अलर्ट?

Gokul Election: निकाल जाहीर होताच महायुतीला दाखवला कोल्हापुरी हिसका; मुश्रीफ,नरकेंचं नाव घेत सतेज पाटील काय म्हणाले?

साठीच्या शिवसेनेला GEN Zचा चेहरा, आदित्य ठाकरे शिवसेनेचे नवे कार्याध्यक्ष?

Gokul Election: सतेज पाटलांचा नादखुळा; महायुतीच्या चार पहेलवानांना घोबीपछाड

SCROLL FOR NEXT