Dhangar reservation Chaundi Saam tv
महाराष्ट्र

Dhangar Reservation Chaundi: धनगर समाजाचं उपोषण मागे; मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश

Dhangar reservation Chaundi: अहमदनगरच्या चौंडी येथे धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी सुरु असलेलं उपोषण 21 व्या दिवशी थांबवलं आहे.

Vishal Gangurde

सुशील थोरात

Dhangar Reservation:

अहमदनगरच्या चौंडी येथे धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी सुरु असलेलं उपोषण 21 व्या दिवशी थांबवलं आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला आज यश मिळालं आहे. (Latest Marathi News)

सरकारच्या लेखी आश्वासनानंतर अखेर २१ दिवसांनंतर यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं उपोषण सोडले आहे. गिरीश महाजन आज उपोषणस्थळी दाखल झाले आणि सुमारे दोन तास उपोषणकर्ते आणि फोनवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या बरोबर चर्चा करून यातून तोडगा काढला.

बाळासाहेब दोलताडे, अण्णासाहेब रुपनवर आणि सुरेश बंडगर यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नारळाचे पाणी पिऊन उपोषण सोडले. यशवंत सेनेचे धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी हे उपोषण सुरु होते. यावेळी राज्य सरकारकडून दिल्या गेलेल्या आश्वासनांबाबत गिरीश महाजन यांनी उपोषणकर्त्यांना माहिती दिली.

याआधी मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत धनगर आरक्षणाबाबत चर्चाही झाली होती. मात्र ही चर्चा निष्फळ झाल्यानंतर आमरण उपोषण सुरू होते. सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केल्यानंतर आज पुन्हा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन चौंडी येथे दाखल झाले आणि अखेर २१ दिवसांनंतर या उपोषणावर तोडगा निघाला.

विखे पिता-पुत्रांविरोधात घोषणाबाजी

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्याबाबतची आंदोलनकर्त्यांमधील नाराजी दिसून आली. चौंडी येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये उपोषणकर्त्यांचा बरोबर चर्चा सुरू असताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच खासदार सुजय विखे यांचा निषेध करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranveer Singh : 'धुरंधर 2'ची Success पार्टी रणवीर सिंगने गाजवली; fa9la गाण्यावर बेभान होऊन नाचला, VIDEO होताय तुफान व्हायरल

Badlapur New Railway: बदलापूरवरुन नवी मुंबई गाठा फक्त ३० मिनिटांत; नवा रेल्वे मार्ग लवकरच येणार सेवेत; काय आहे सरकारचा मेगाप्लान?

Homemade Facepack For Oily Skin: उन्हाळ्यात त्वचा तेलकट आणि चिकट होतेय? हा घरगुती फेसपॅक लावा, त्वचा होईल मऊ आणि टवटवीत

Rupali Chakankar: सोमवती अमावस्येच्या दिवशी रुपाली चाकणकर कुठे होत्या? सुषमा अंधारेंच्या आरोपावर दिलं स्पष्टीकरण

Maharashtra Live News Update: वाशिमकरांच्या चिंतेत वाढ,शहरावर पाणी टंचाईचं संकट

SCROLL FOR NEXT